
जनता लाॅकडाऊन शासन
Read Count : 118
Category : Poems
Sub Category : N/A
एका सूक्ष्म जिवाने ,अख्खा देश बंद पाडला.मग शासनाने जनतेला,नको नको तो निर्णय धाडला.अविस्मरणीय साल आहे हे,हा तर नवा इतिहासच घडला.लोकं रोगामुळे .....पटापट मरू लागली .तर गरीब दुुुबळी लोकं ,अन्न अन्न करून झुरू लागली .हा अचानक आलेला रोग आणि,शासनाने अचानक घेतलेला निर्णय ,गरीब लोकांवर भारी पडू लागला.गरीब जनता तर अन्न मागून खाते,पण श्रीमंतीचा माज असणाराही,अन्न अन्न करून रडू लागला.काहींना एक वेळ पोटाची ,आग विझवता नाही आली .तर .......काहींची नियमापुढे गय नाही केली.मग भुकेने व्याकुळ होऊन लोकं ,आपल्या झोपड्यांकडे धावू लागली.आणि नंतर ' आमची मुुंबई ' मात्र ,रिकामी होऊ लागली.काहींना जायला एसीची गाडी ,तर काहींना स्पेशल वाहने होती .गरीब मात्र चालत होते ,शेवटी त्यांंच्याही पायांंनी साथ सोडली होती .देशाची अर्थथव्यवस्था ढासळूू नये म्हणून,अभिनेेत्यांंनी कोटीवर पैसे दान केले.एवढा पैसा असतानाही शाासनाच्या कानावर,गरीबांचे आवाज नाही गेेेेले.अर्थव्यवस्था पुन्ह्याने सुुधारण्यासाठी,दारूची दुकानं सुरू केेली.पिकांंची मात्र होळी झाली तरी ,त्या बळीराजाची हाक,शासनााला ऐकू नाही आली.नियतपण कशी खेळ खेळते,आज.....आपल्याच माणसांना भेटल्यावरहात धुवायची वेळ आली .निसर्गाने कोणालाच सोडलं नाही,सर्वांची एकच माळ केली.शेवटी मृत्यूनेच प्रश्न केला,अरे ! इथेच यायचं होतं ....तर एवढा उशीर का केला?एवढं वैभव कमवून काय मिळालं ?तूझ्या कपाळावर लावलेला,एक रूपयाचा शिक्काही,मातीतच राहून गेला.(कवी: सिमा निवृत्ती ससाने )मुंबई अग्निशमन दलविक्रोळी अग्निशमन केंद🚒🚒🚒🚒🚒🚒
Comments
- No Comments