🔥अग्निशामक होऊन बघ% Read Count : 8

Category : Poems

Sub Category : N/A
डिफेन्स मध्ये जायची ईच्छा होती फार,
अपयश आले अनेकदा
पण मानली नाही हार. 
भरती झालोत  वर्दी आली, 
कोवीड 19 मुळे जन सेवाही झाली .
याच नादात आयुष्य जगण्याची 
ईच्छा लागून गेली.
ईमानदारी कर्मा आमच्या, 
तरीही विचारत नाही जग. 
म्हणून म्हणतो एकदा तरी 
अग्निशामक होऊन बघ !!!
जिव मुठीत घेऊनच तर ,
ड्यूयटीवर जातो .
कुठेही उभा राहून  हातात घेऊन 
ऊभ्याने भाकर आम्ही खातो. 
ऊन-वारा  ,पाऊस-पाणी, 
यांंचंं थैैैमान आमच्या डोक्यावर.
घरी येईपर्यंत विश्वास नसतो आमचा ,
आमच्याच ह्रदयांच्या डोक्यावर. 
भिरभिरतात कधी कधी, 
मनात आमच्या विचारांचे काळे ढग. 
म्हणून म्हणतो एकदा तरी, 
अग्निशामक होऊन बघ. 
लोकांंसाठी लोकांंकरीता ,
आम्ही सदैव  दक्ष.
हानी कुठे होऊ नये,
 यावर आमचंं लक्ष .
सन वार काहीच नाही, 
नाही कुठली सुट्टी. 
आपेेेक्षांची राखरांगोळी,
स्वप्नांची होते भट्टी. 
वरून जरी शांत आम्ही 
आतूूून दुखःची धग. 
म्हणून म्हणतो एकदा तरी, 
अग्निशामक होऊन बघ. 
नियम सर्वांना सारखेच, 
नसतात माझ्या घरचे. 
पालन करतो आम्ही, 
जे वरिष्ठ सांगतात वरचेे. 
अपशब्द बोलने टाळा, 
वागू नका विचित्र. 
आमच्याहीहातात हात द्या, 
आम्ही पण तुमचे मित्र. 
समजून घ्या अजूनही आम्हाला, 
पश्चात्ताप होईल मग. 
म्हणून म्हणतो एकदा तरी 
अग्निशामक होऊन बघ. 
आम्ही मागेे राहण्याची, 
ही वेळ का आली?
स्वाभिमान धूळीत आमचा,
का ही वाईट वेळ आली?
शिताहून भाताची परीक्षा नको घेऊ, 
सगळेच जीव ओतताहेत, 
चल ! यांनाही उपमा कााही देऊ
आम्ही पण माणूस आहोत, 
आम्हाला समजू नका अलग. 
म्हणून म्हणतो एकदा तरी, 
अग्निशामक होऊन बघ. 
              
                   
                 (   कवी लेखन :    सिमा निवॄत्ती  ससाने )
                          मुंंबई अग्निशमन दल 
                       विक्रोळी अग्निशमन केंद्र
                    🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒

Comments

 • Ayesha Siddiqa

  Ayesha Siddiqa

  what are you writing....? i can't read one word....🤔🤔🤔

  Jun 21, 2020

 • Avhod Benewely

  Avhod Benewely

  Please write in the link language

  Jun 21, 2020

Log Out?

Are you sure you want to log out?