
अंत
Read Count : 106
Category : Poems
Sub Category : N/A
खूप धावपळ केली
पण काहीच हाती लागलं नाही.
खूप काही कमवलं पण
आज जवळ काहीच उरलं नाही.
कधी स्वतःसोबत रेस लावली तर,
कधी नशीबा सोबत.
सारं काही मिठासारखं विरघळून गेलं,
शेवटी कोणीच उरलं नाही.
खूप उशीर केेला आयुष्य जगायलाा,
वय माात्र दिवस मागे लोटत गेलं,
कधीतरी आनंद हवा होता
म्हणून दुखः घोटत गेेेेलं.
कधी दुखाःच्या सरी आल्या
आणि कधी ओल्या करून गेेेेल्या समजलंच नाही.
शेवटी एकच विसावा उरला
आणि तोच आयुष्याचा अंंत ठरला(सिमा निवॄत्ती ससाने )
Comments
- No Comments