आई-बाप
Read Count : 66
Category : Poems
Sub Category : N/A
आठवण आली अचानक म्हणून
रात्री माझ्या बापाला फोन केेला,
हॅलो !....बोलला मााझा बाप
पण आवाज जरा बारीकच आला.
मी विचारले पटकन,
काय झालं ? आवाज का बदलला?
त्याने सांगितलं तो झोपून ऊठला.
खुशाली विचारली तर सगळं चाांगलं आहे
तूच स्वतःला जपत जा,
असं मन मोठं करून सांगितलं.
मनात दुखः लपवून हसत बोललेेेेला बाप,
आईने माझ्या बघीतला,
मग तिने पटकन फोन तिच्या हातात घेेतला.
आई माझी मुळूमुळू
रडायला लागली.
आईच्या फुसफूूूसणा-याा आवाजााने,
मलाही काळजी वाटून गेेली.
भावाला आईच्या जेेवणाची ,
आता चव पटत नाही .
पैशाने मोठा झाला तो,
आता आई-बापची गरज भासत नाही.
आई-बाप थकून गेलेत
भाऊ मात्र स्वतःलाच जपत गेेला.
आठवण आली अचानक म्हणून
रात्री माझ्या बापाला फोन केला.
बाहेर सर्वांशी चाांगलं राहून,
रोज आई-बापासोबत धूमशान घालाायचं,
ज्या पहिल्या शब्दाने आई आनंदून गेली,
त्याच तोंडातून आज त्याने वाईट बोलयचं.
झुरतात ते आई-बाप,
मुलाचं असं वागणं बघून ,
किती हाल होत असतील त्यांचे,
पोटच्या पोरासोबत राहून.
स्वतःच्या कष्टाची अजून,
चटणी दिली नाही त्याने.
आई-बापाने आपल्या सुुुुखासाठी,
केलेले कष्ट कसें विसरावेे याने?
पाण्यात मीठ टाकल्यासारखे,
झुरत असतील ना ते
असा मनात विचार आला,
आठवण आली अचानक म्हणून,
रात्री माझ्या बापाला फोन केला.
खूप कष्ट केल माझ्या बापाने
आम्हाला आयुष्य भराच सूख देण्यासाठी,
आत्ता पर्यंत कंबर कसलं होतं.
सोनियाचा दिवस बघायचा होता,
सूखाच म्हातारपण त्याला आमच्यात दिसलं होतं.
एकच संधी दे आई-बापाच्या सेवेची,
आयुष्यात देवाकडे एवढीच मागणी करेन.
आई-बापाविना आयुष्य् किती ऊनं असतं,
हा विचार करून एक दिवस भाऊपण झुरेन.
आम्ही तूझ्याकडेच येऊ,
असा आईच्या तोंडून शब्द गेेेला,
आठवण आली अचानक म्हणून,
रात्री माझ्या बापाला फोन केला.
(सिमा निवृत्ती ससाने)
Comments
- No Comments