
आई
Read Count : 184
Category : Poems
Sub Category : N/A
--आई--पुण्याचा किती संचय केलासंचित होते कुठले केले ?की त्याचे फल स्वरूप मीतुझ्या कुशीतील लेकरु झाले ।।निरक्षर तू... गरिबही तू...तरीही मागे सरली नाहीस,लेकरांच्या शाळेसाठीमूकपणाने कष्टत गेलीस ।।टोपल्यातल्या दोन भाकरीआम्हा मुलांना दिल्यास वाटुन,करकचून मग तुझी खपाटीकित्येक वेळा नेल्यास मारून ।।लुगड्याच्या कंबळेत वाचवून,दोन रुपये ठेवत होतीस...,सणासुदीला आमच्यासाठीगोड-धोडही रांधत होतीस ।।बापाच्या व्यसनापायी,सोशिकतेने जळत होतीस,आगतिक पाणी डोळ्यामधलेपदराने मग पुशित होतीस...!!खंबीर बाणा तुझा पहातचपाय रोऊनी उभे राहिलो,करारीपणा स्वभावातलाअंगीकारूनी चालत आलो ।।शांतपणाचा शीतल सुरमातुच आमुच्या नयनी भरला,नशिबालाही हरवण्याचातुझा वारसा आमुच्यात आला ।।आज तू न, नाही तुझा आधारतुझीच ताकद अंगी आहे,पायाखाली तुझीच वाट अन्समोर रस्ता तुझाच आहे ।।
Comments
- No Comments