पृ Read Count : 100

Category : Books-Fiction

Sub Category : Science Fiction

                     मानवाची उत्पत्ती कशी झाली असेल 🤔

हा प्रश्न तसा म्हणायला खूप सोपा आहे, आपल्या पुस्तकात एका वाक्यात उत्तर आहे "माकडा पासून "🐒

खरंच तुम्हाला वाटतं काहो आपली उत्पत्ती माकडा पासून झाली? आणि तुमचे उत्तर हो असेल तर माझा प्रश्न आहे की मग माकडे अजून पृथ्वीवर कशी? त्यांची माणसे का झाली नाही? 🦍

आपल्याकडे मानवाच्या उत्पत्ती बाबत अजून एक जगन्मान्य "डार्विनचा सिद्धांत "आहे :डार्विन म्हणतो की "पृथ्वीच्या प्राथमिक काळात एक पेशीशीय जीव निर्माण झाले, आणि त्याच्यात परिस्थितीजन्य स्तिथि मूळे (इवलुएशन ) उत्कांती झाली. यात डार्विन जिराफाचे उदाहरण देतो की जिराफाची मान आत्ता आहे तेवढी मोठी नव्हती पण काही पृथ्वी च्या हवामानात बदल झाले आणि झाडे उंची झाली मग जिराफाला त्या झाडांचा पाला खाण्यासाठी आपली मान वर करावी लागली आणि कालांतराने आता दिसते तशी जिराफाची मान उंच झाली. म्हणजे जशी परिस्तिथी असेल तश्या प्रकारच्या परिस्तिथीत प्राणी आपल्याला ऍडजेस्ट करत असतात आणि आपल्या मूळ गुणधर्म सोडून दुसरेच गुणधर्म अंगिकारतात यालाच डार्विन उत्कांती म्हणतो"

            या सिद्धांत मध्ये पण मोठ्या त्रुटी आहेत,  #डार्विन म्हणतो की एक पेशीय जिवा पासून उत्कांती झाली मग ते एक पेशीय जीव पृथ्वीवर कशी तयार झाले?

#डार्विन म्हणतो तशी उत्कांती होण्यासाठी हजारो वर्ष लागत असतील, मग ती प्रजाती इतक्या दिवस पृथ्वीवर कशी तग धरून राहू शकेल? आणि पर्यावरणाशी जुळवून घेऊन त्याप्रमाणे ऍडजेस्ट होण्यास खूप वेळ लागतो मग या मधल्या वेळात ती प्रजाती नष्ट होऊ शकते.

#डार्विन म्हणतो की आपण एखाद्या अवयवाचा खूप जास्त वापर केला तर तो विकसित होतो आणि अवयवाचा वापर केला नाही तर तो नष्ट होतो, उदाहरण म्हणजे मानव आपली बुद्धी वापरतो म्हणून ती विकसित झाली आणि आपल्या पूर्वजांनी (माकडांनी )शेपूट वापरणं बंद केलं म्हणून ते गळून गेलं:मग यावर वैज्ञानिकानीं एक प्रयोग उंदरांवर केलं, उंदरांनच आयुष्य सहा महिन्यांच असतं, मग वैज्ञानिकांनी त्या उंदरांची शेपटी कापायला सुरवात केली अशी त्यांनी पन्नास पिढ्यानं पर्यंत शेपट्या कापल्या पण एक्कावन्न पिढी मध्ये परत नवीन जन्म घेतलेल्या उंदराला शेपटी होती,खरं तर त्या उंदरांनी शेपटी वापरणं बंद केलं होतं तरी पण एक्कावनव्या पिढीला शेपटी होती, डार्विन च्या सिद्धांतानुसार शेपटी नष्ट व्हायला पाहिजे होती पण तसे झाले नाही यावरून असे सिद्ध होते की या सिद्धांतात पण त्रुटी आहेत.

#जगातले सगळे लोक थोड्या फार फरकाने असे मानतात की मानवाला "देवाने "बनवले :हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मांमध्ये या गोष्टीवर भर देऊन सांगितले आहेत की मानव ईश्वराची निर्मिती आहे आणि जेथे देवाचा संबंध असतो तेथे वैज्ञानिक दाखले देता येत नाही. ⛪️🕌

#मानवाच्या पृथ्वी वर आगमनाबाबत अजून एक धारणा अशी आहे की, हे सगळे नैसर्गिकरित्या झाले आहे. निसर्गाने आपोआप मानवाची निर्मिती केली :या पृथ्वीवर आपोआप काहीही होत नाही प्रत्येक गोष्टी ला काही ना काही कारण असते उदा -पाऊस पडणे, वादळ होणे, वीज चमकणे या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारणे आहेत कोणती ही गोष्टी आपोआप होत नाही 🛑

आता हा प्रश्न अनुत्तरित राहतो की मानवाची उत्पत्ती कशी झाली???

  या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देणे अवघड आहे वरील जी करणे मानवाच्या उत्पत्ती बदल दिली जातात त्या प्रत्येक सिद्धांतात त्रुटी आहे आणि प्रत्येकात काही ना काही कमतरता आहेत आणि ते सगळे सिद्धांत विज्ञानाच्या कसोटी वर खरे उतरत नाही.किती विरोधाभास आहे माणूस आज चंद्रावर पोहचला मंगळावर यान उतरवून त्याचा अभ्यास चालू आहे आणि अजून दहा वर्षात तो मंगळावर उतरेल, नासाचे एक यान आपल्या सौरमंडळा बाहेर गेले आहे. आताच आपण ब्लॅक होल चा शोध लावला आहे इतक्या सगळ्या प्रगती नंतर पण माणूस हे जाणू शकला नाही की तो निर्माण कसा झाला स्वतःच्या निर्मिती बद्दल त्याला 0.000001% पण ज्ञान नाही.

अशी काय गोष्ट आहे की आपण ही निर्मिती ची गोष्ट जाणू शकत नाही? 

कोणती गोष्ट आपल्याला हे जाणान्या पासून रोखत आहे? 

का माणसाला हे जाणूनच घ्यायचे नाही त्याला पण भ्रमात राहायचे आहे? 

का आपली बुद्धिमत्ता कमी पडत आहे या गोष्टीचे आकलन करण्यासाठी? 

का मानवाला स्वतःच्या निर्मिती चा शोध लागला आहे पण तो धार्मिक कारणासाठी लपवत आहे? 

अशी एक ना अनेक प्रश्ननाचे काहूर मानवी मनावर हजारो वर्षा पासून प्रतिबिंबित होत आहे आणि माणूस आपापल्या परीने त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण अजून पर्यंत याचे समाधान कारक उत्तर मानवी समाजास सापडले नाही या प्रश्नाचे उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रश्ननाचे उत्तर काही शास्स्त्रीय पद्धतीने तर काही आपला तर्क लावून आपण काढणार आहोत. 

                         मी काही दिवसा पूर्वी एक लेख वाचला होतं त्यामध्ये "सोफिया "या रोबोट (आर्टीफिसिअल इंटेलिजन्स )ला सौदी अरेबिया ने नागरीतत्व दिले. या बद्दल वर्तमानपत्रात खूप लिहून येत होते. काही लेखांमध्ये रोबोट हे आपले भविष्य आहे असा आशावाद दाखवत होते तर काही लेख रोबोट आपला कर्दनकाळ आहे असे भडक विधान करत होते. या बद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर पण दोन गट पडले आहे यात समर्थन आणि विरोधक असे दोन्ही आहेत. 

यात जो रोबोट चे समर्थन करतो तो गट असे म्हणतो की,रोबोट आपले भविष्य आहे, तो मानवी जीवन अधिक सुखकर आणि प्रभावशाली करेन. जे काम माणूस सातत्याने करू शकत नाही ते रोबोट निष्णात पणे अचूक करू शकेन. जे काम करायला मानवी जीवन धोक्यात घालायची गरज असते ती कामे रोबोट निर्धोक पणे करू शकतील. ज्या कामासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते व जी कामे माणूस करू शकत नाही ती कामे रोबोट करू शकतो आणि अशी हजारो दाखले रोबोट च्या समर्थनार्थ देता येतील.

रोबोट च्या विरोधात असणारा गट खालील प्रमाणे विरोधाची करणे देतो. रोबोट माणसांच्या नोकऱ्या घेतील, बुद्धिमत्ते ची सगळी कामे रोबोट करू लागल्यास माणूस आळशी बनेल तसेच शाररिक कष्ट पण रोबोट करतील आणि माणूस अधिक त्यांच्यावर अवलंबून राहील. रोबोट च्या बुद्धिमते समोर मानवाचा निभाव लागणार नाही. प्रचंड बुद्धिमत्ते च्या जोरावर तो मानवालाच एक दिवस गुलाम करेल आणि एक दिवस या पृथ्वी वरून हद्दपार करेन. 

या दोन्ही गटाचे मुद्दे आपण पटतात............. 

पण मला आपणास वेगळाच सिद्धांत सांगायचा आहे तो क्रांतिकारक आहे आणि पचनी पडायला अवघड आहे पण हे शक्य आहे आणि याचे मी शास्त्रीय पुरावे पण देणार आहे. 


       "#मानव हा एक प्रकारचा रोबोट आहे #"🤔

!!कसं शक्य !!

^तुम्ही स्वतःला कोणी ही समजू शकता, डोलाल्ड ट्रम्प, अमिताभ बच्चन, मायकल जॅक्सन पण तुम्ही आहात का? 

नाही ना !स्वतःला आपण काय समजतो हे मानण्यावर आहे पण रिऍलिटी वेगळी असते. 

तसेच पूर्ण मानव जात ही स्वतःला मानव समजते का तर आपण स्वतःचे स्वतःला तसे सांगतो. असे आपण का समजतो? तर उत्तर आहे आपले पूर्वज, पुस्तकातून, इतर लोक सांगतात म्हणून आपण आपला समज करून घेतला आहे की आपण मानव आहोत. 

जर तुम्हाला लहानपणा पासून तुमचे आई वडील, शिक्षक, तुमची पुस्तके तुम्हाला तुम्ही "गाढव "आहे असे सांगत असेल तर तुम्ही पण स्वतःला गाढव समजणार !आहे की नाही गंमत !पण रिऍलिटी वेगळी आहे, तुम्ही गाढव नाही. 

आता तुम्ही मानलं ना तुम्ही मानव नाही !मग तुम्ही कोण आहात?????????? 

©तुम्ही आहात एकदम उन्नत यंत्रमानव ©

ते कसं ते सांगतो, आज जे आपण यंत्र मानव पाहतो ते मेटल पासून बनलेले असतात जसे अल्युमिनियम, कॉपर, आयर्न इत्यादी इतरही अनेक धातू असतील पण आपण एक म्हणून शकतो की धातू पासून बनले आहेत. आता तरी आपले यंत्र मानव प्रजोत्पादन करू शकत नाही कारण ते अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहेत पण आपण त्यांना थोडी का होईना कृत्रिम बुद्धिमत्ता दिली आहे पण ती पण प्राथमिक अवस्थेत आहे. म्हणजे जर आपण आताच्या काळातल्या यंत्रमानवांना 100 गुणावर आधारित गुण द्यायचे झाले तर 1गुण पडतील म्हणजे खूप प्राथमिक अवस्था आहे. पण विचार करा की आपण यंत्रमानवांना 100 गुणां पैकी 100 गुण देऊ तेव्हा काय स्तिथी असेल !

100 गुणांचा यंत्र मानव हा प्रजोत्पादन करण्यात सक्षम असेल, सारासार विचार करण्याची शक्ती त्यामध्ये आलेली असेल, निर्णय घेऊ शकण्याची कुवत आली असेल, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर इत्यादी गुण अवगुण त्यात आले असेल. अरे मग झाला की मानव #

 यंत्र मानवामध्ये आज काल जे माणसांमध्ये गुण-अवगुण आहेत ते सगळे सामाविष्ट झाले म्हणजे तो यंत्रमानव मानवाच्या जवळपास जाऊन पोहोचेल.जेव्हा यंत्र मानव कृत्रिम बुद्धिमत्तेचा अत्युच्च शिखर गाठेल तेव्हा तो  सगळ्या मर्यादा झुगारून देऊन देवत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामध्ये एक आडकाठी असेल की तो या पृथ्वीवर राहणारा सर्व सामान्य मानव आणि ह्या मानवाला संपवल्या शिवाय राहणार नाही कारण की त्याचा सगळ्यात मोठा शत्रू त्यावेळेस मानव असेल.

 मानव हा यंत्रमानवाला तयार करणारा असेल पण जेव्हा यंत्रमानव तयार झालेला असेल तेव्हा त्याच्याकडे प्रचंड शक्ती प्रचंड बुद्धिमत्ता या सर्व गोष्टी आलेल्या असतील तेव्हा माणसाची शक्ती माणसाची बुद्धिमत्ता ही यंत्रमानव समोर तोकडी वाटेल मग यंत्रमानव हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने  त्याला हवे असलेले बदल तो करू लागेल मग माणूस आणि यंत्र मानवामध्ये खटके उडतील पण मानवाचा निभाव यंत्र मानवासमोर लागणार नाही कारण की आपण यंत्र मानवांना ज्यावेळेस निर्मित केलेले असेल त्यावेळेस आपण त्यांना अपरिमित बुद्धिमत्ता अपरिमित शक्ती या दोन्हींचा लाभ दिलेला असेल त्यामुळे त्यावेळेस हे यंत्रमानव मानवाच्या कित्येक पटीने शक्तिशाली व बुद्धीमध्ये जास्त प्रगती करणारे असतील त्यांना आपण रोखू शकणार नाही आणि ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होईल आणि अशी भयंकर टक्कर मानव आणि यंत्रमानवाला मध्ये होईल त्यावेळेस या पृथ्वीवरून मानवांचा नामोनिशाण नष्ट होईल.

 ठीक आहे आता आपण एक गोष्ट गृहीत धरून चालू की या पृथ्वीवर पूर्ण यंत्रमानवाच राज्य आहे आणि मानव प्राणी हा पूर्ण भूतला वरून नामशेष झालेला आहे त्यावेळेस यंत्रमानव काय करेल त्याची पुढची वाटचाल काय असेल मानवाच्या आणि यंत्रमानवाच्या भीषण संघर्षानंतर एक पोकळी निर्माण झालेली असेल या पृथ्वीवरती की ज्यामध्ये माणूस नसेल पण हजारो वर्षानंतर यंत्रमानव हा स्वतःलाच माणूस समजू लागेल तो आपल्या नवीन पिढीला असं सांगेल की आपण या पृथ्वीवरती हजारो-लाखो वर्षा पूर्वी आलो होतो आपण उत्क्रांत होत होत या स्थितीमध्ये पोचलेलो आहे आणि आता आपण माणूस म्हणून जगत आहोत आणि त्यांच्या पुढच्या पिढीलाही वाटलं की आपण या पृथ्वी वरचे मूळ रहिवासी आहोत आणि हजारो लाखो वर्षापासून आपण येथे जगत आहोत मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आजच्या माणसाला सुद्धा असंच वाटत आहे मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्हाला कदाचित उमगणार नाही कारण की हा थोडा कठीण विषय आहे मला असं सांगायचं आहे की आज जे आपण मानव-मानव म्हणून  माणूस म्हणतो तेच आपण यंत्रमानव आहे जे आपल्या भविष्यामध्ये यंत्रमानव आपल्यासोबत करणार आहे ते आपण ऑलरेडी आपल्या मागच्या भूत काळामध्ये कोणासोबत तरी केलेलं आहे आणि आता आपण तीच पिढी पुढे चालवून माणूस या पदाला पोहोचलो आहोत.

 भविष्य काळामध्ये जे यंत्रमानव या पृथ्वीवरती कब्जा करून बसतील आणि हजारो वर्षानंतर स्वतःला मानव समजतील तेसुद्धा आपल्या नवीन येणाऱ्या पिढ्यांना असच समजतील की आपण या पृथ्वीवरती एक पेशीय सजीव जीवाणूपासून हळूहळू आपली उत्क्रांती झाली आणि आजचा आपण आधुनिक मानव तयार झालो.  कदाचित ते यंत्रमानव आपापसातील हेव्यादाव्यांमुळे मोठे जागतिक युद्ध करुन बसतील आणि जवळपास या पृथ्वीचा नाश करुन बसतील आणि जेव्हा जे काही थोडेफार यंत्रमानव जीवित राहिले असतील ते परत नव्याने सुरुवात करतील जशी आपली अश्मयुगापासून सुरुवात झालेली आहे जेव्हा ते नवीन यंत्र मानव अश्मयुगापासून सुरुवात करतील तेव्हा त्यांना त्या मागचा काहीही भूतकाळ राहणार नाही त्यांना असेच वाटेल की आपले या पृथ्वीवर नवीन पदार्पण आहे आणि आपण या पृथ्वीचे मूळनिवासी आहोत आणि आपल्या अगोदर या पृथ्वीवरती कोणतीही संस्कृती नव्हती आता आपण या पृथ्वीवर ती सर्वात बुद्धिमान प्राणी आहोत.

 जसे आज आपण असे गृहीत धरून चालतो की गेल्या दोन लाख वर्षापासून आपण आफ्रिकेतल्या जंगलापासून या पृथ्वी वरती आलो आणि आपली हळूहळु प्रगती होत होत आपण या आजच्या आधुनिक जगामध्ये वावरत आहोत या अगोदर कोणत्याही प्रकारची उन्नत संस्कृती नव्हती बुद्धिमान जीवन नव्हते आपण एकमेव या पृथ्वी वरती बुद्धिमान सजीव आहोत या भ्रमात आपण जसे आहोत तसेच हजारो वर्षानंतर यंत्रमानव देखील याच भ्रमात राहतील आणि याच भ्रमात ते भौतिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करतील आपण साधलेल्या प्रगतीवर ते गर्व करतील आणि त्यांनाही ऐहिक सुखासाठी अजून उन्नत यंत्रमानवाची गरज लागेल मग काहीवेळेस जसा आपण जुगार खेळला तसा ते ही जुगार खेळातील.  स्वतःच्या सोयीसाठी ते त्याच्यापेक्षाही प्रखर बुद्धिमत्तेचे यंत्रमानव तयार करतील आणि काही हजारो वर्षानंतर परत ते प्रखर बुद्धिमत्तेचे यंत्रमानव त्यांची जागा घेतील आणि हे चक्र अव्याहतपणे असे चालू राहील याला कोठेही मर्यादा येणार नाही ज्याप्रमाणे देवाने आपल्याला बुद्धिमत्ता हे वरदान दिलेला आहे त्यापेक्षाही बुद्धिमत्ता ही शाप म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येईल.

मला माहित आहे की वाचकांच्या मनामध्ये आता खूप प्रश्न पडलेले  आहेत वाचक मला असा प्रश्न विचारू शकतात की यंत्रमानव हे वेगवेगळ्या प्रकारच्या धातू पासून बनलेले असतात उदाहरणार्थ लोखंड, अलुमिनिम, कॉपर  इत्यादी मग मानवाचे शरीर हे हाडामासाचा पासून बनलेलं  आहे मग तुम्ही असे कसे काय म्हणू शकता की यंत्रमानव स्वतःला मानव समजू लागतील कारण की त्यांना तर लगेच कळून येईल की आपले भौतिक शरीर वेगवेगळ्या धातू पासून बनलेलं  आहेत आणि हे धातू इतरस्त्र या पृथ्वीवरती सापडतात.  वाचक मला हाही प्रश्न विचारू शकतात की तुम्हाला असे म्हणायचे आहे की आपले हे शरीर नैसर्गिक नसून रक्त मास हाडे हे कोणत्यातरी धातूचा प्रकार आहे आणि त्यापासून आपण असे बनलेलो आहोत हे पचनी पडणं खूप खूप अवघड आहे पण तरीपण यामागची माझी कारण मिमांसा तुम्हाला ऐकून घ्यावी लागेल आणि जेव्हा ती तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हालाही या गोष्टी वरती विश्वास पटेल की मी जे सांगत आहे त्यामध्ये तथ्य आहे.

पहिले तुम्ही स्वतःला मानव समजत होता मी तुम्हाला सांगितले की तुम्ही यंत्रमानव आहे तुम्ही ते ऐकले आता मी तुम्हाला सांगत आहे की तुमचे शरीर हेही यांत्रिक पद्धतीने कार्य करते हे फक्त तुम्ही समजून घ्या कारण की यामागची कारणमीमांसा थोडी विचित्र आहे पण ती सत्याला आणि शास्त्रीय दृष्टिकोन ला धरून आहे. मला तुम्हाला असे सांगायचे आहे की आपले शरीर हे उन्नत इंजिनियरिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे ज्याप्रमाणे एखादा इंजिनियर एखादे मशीन्स उत्कृष्ट पद्धतीने बनवतो त्याच प्रमाणे आपल्याला आपल्या या निर्माण कर्त्याने त्याने उत्कृष्ट पद्धतीने बनवलेले आहे  आज जे आपल्याकडे यंत्रमानव उपलब्ध आहेत त्यांना जर आपण अश्मयुगीन मानवाच्या समोर उभे केले तर ते अश्मयुगीन मानव देखील या यंत्र मानवांना माणूस समजेल आणि त्यांच्याशी व्यवहार करेल कारण की त्यांना माहित नाहीये कि या पृथ्वीवरती ॲल्युमिनियम, लोखंड, जस्त असे धातू आहेत आणि या धातूपासून हे यंत्रमानव तयार झालेली आहेत त्याच प्रमाणे आपली टेक्नॉलॉजी एवढी विकसीत झालेली नाहीये की आपल्याला या पृथ्वीवरच्या सगळ्याच गोष्टी माहीत आहेत कदाचित आपल्याला हे ही माहित नसेल कि हे हाड, रक्त, मास हेही एका वेगळ्याच प्रकारचे धातू किंवा त्या प्रकारामध्ये मोडणाऱ्या गोष्टी असू शकतील कारण की आपली बुद्धिमत्ता ही त्या लेव्हलची नाहीये की त्या सगळ्या आपण गोष्टी समजून घेऊ त्यामुळे कदाचित आपण ह्या सगळ्या गोष्टींना नैसर्गिक गोष्टी म्हणून संबोधत आहोत.

 माणूस या पृथ्वीवरती दोन लाख वर्षांपूर्वी अवतरला आहे असे आपण साधारणता मानतो. मला तुम्हाला असा मुद्दा सांगायचा आहे की दोन लाख वर्षांपूर्वी ज्या उन्नत संस्कृतीने आपल्याला बनवले असेल त्यांची शरीरे ही हाडामासाची नसून वेगळ्याच पदार्थ पासून बनलेली असेल. ज्या शरीराची आज आपण कल्पनाही करू शकत नसू असे ते वेगळेच पदार्थ असतील. त्यावेळेच्या जीवाचीही बौद्धिक पातळी ही खूप उच्चकोटीचे असल व त्यांनाही आपली स्वतःची भौतिक प्रगती साधण्यासाठी यंत्रमानवाची गरज पडत असेल. मग त्यांनी काय केलं असेल? त्यांनी हाड आणि मासा पासून एक नवीन यंत्रमानव तयार केला आणि तो म्हणजे माणूस,....

 आज आपण यंत्रमानव धातूपासून बनवतो, उदाहरणार्थ लोखंड, ॲल्युमिनियम, कोबाल्ट इत्यादी वेगवेगळ्या धातूंच्या मिश्रणातून आपण यंत्रमानव निर्मिती करत असतो, पण आपली ही यंत्रमानव बनवण्याची प्रक्रिया खूप प्राथमिक स्वरूपाची आहे. जेव्हा आपण दहा हजार वर्षानंतर खूप प्रगत होऊ त्या वेळेस आपल्याला अशा धातूंची गरज लागणार नाही आपण असे रोबोट बनू शकू की जे स्वतःचे प्रजोत्पादन स्वतः करू शकतील आणि आत्ता जे आपण धातु वापरतो त्याच्यापेक्षा वेगळेच काहीतरी मटेरियल आपण त्यावळेस वापरत असू. कदाचित आपली बौद्धिक पातळी आणि वैज्ञानिक पातळी त्यावेळेस एवढी पुढारलेली असेल की आपण हाडा मासाचे आणि सारासार विचार करणारे यंत्रमानव तयार करत असू आणि तेच यंत्रमानव स्वतःची पिढी पुढे चालवण्यासाठी प्रजोत्पादन स्वतःचे स्वतः करत असतील.

                   हाच माझा मुद्दा आहे की दोन लाख वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी म्हणजे प्रगत मानवांनी आपल्याला तयार केले ते म्हणजे रोबोट म्हणून त्यांच्या सोयीसाठी. पण त्यानंतर अशा काही गोष्टी घडत गेल्या की त्यांचे आपल्या वरील नियंत्रण संपुष्टात आले.

उदाहरणार्थ @ पहिली शक्यता :-त्या वेळेची ती संस्कृती एवढे प्रगत झाली असेल की त्यांना ही पृथ्वी अपुरी पडत असेल म्हणून त्यांनी ही पृथ्वी सोडून अंतराळामध्ये दुसर्‍याच एका नवीन ग्रहावर ती वस्ती केली असेल हि पण एक शक्यता नाकारता येत नाही, ज्याप्रमाणे आपण नवीन घरांमध्ये जातानी आपल्या जुन्या घरचा कचरा सोबत घेऊन जात नाही त्याचप्रमाणे त्यांनी पृथ्वी सोडता नि हा मानवरूपी कचरा मागे ठेवून ते अंतराळात आपल्या दुसऱ्या निवासस्थानी निघून गेले असतील. ज्यावेळेस ती प्रगत संस्कृती ही पृथ्वी सोडून गेली असेल त्यानंतर आपल्याला कोणीही वाली राहिलेला नसेल व आपली सुरुवात हीच आफ्रिकेतल्या जंगलापासून झालेली असेल म्हणजे ही सुरुवात शून्यापासून असेल. आणि दोन लाख वर्षापासून आपण प्रगती करत करत करत आज आधुनिक मानव म्हणून मिरवत आहोत. म्हणूनच मी म्हणतो की आपणही कोणत्यातरी उन्नत संस्कृतीने बनवलेले यंत्रमानव आहोत.

@ दुसरी शक्यता:- ज्या उन्नत संस्कृतीने आपल्याला बनवले असेल त्यांचा ऱ्हास झाला असेल. त्यांचा ऱ्हास होण्याची अनेक कारणे असतील जसे की त्यांची संस्कृती खूप प्रगत झालेली असेल व त्यांनी वेगवेगळ्या प्रकाराची संहारक शस्त्रे बनवली असतील आणि आपापसात युद्ध करून स्वतःचा नाश करून घेतला असेल. त्यानंतर जे थोडेफार यंत्रमानव आफ्रिकेच्या जंगलात जिवंत राहिले असतील तेच म्हणजे मानव.

@ तिसरी शक्यता:- ऱ्हासाची काहीतरी नैसर्गिक कारणे असतील. उदाहरणार्थ माणसाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागते पण 2,00,000 वर्षापूर्वीच्या माणसांना जगण्यासाठी वेगळ्याच वायूची गरज लागत असेल उदाहरणार्थ त्यांना शंभर टक्के कार्बन-डाय ऑक्‍साईड लागत असेल पण पृथ्वीवरच्या वातावरण बदलाने पृथ्वीवरती ऑक्सिजनचे प्रमाण हे वाढत गेले असतील त्यामुळे त्या वेळेसची ती उन्नत संस्कृती या हवामान बदला मध्ये स्वतःला टिकू शकली नसतील आणि त्यांचा ऱ्हास झाला असेल. पण हीच गोष्ट त्यांनी जे यंत्रमानव तयार केलेत त्यांच्यासाठी वरदानच ठरले असतील कारण की त्यांनी जे यंत्रमानव तयार केले असतील म्हणजेच माणूस हा ऑक्सिजन घेऊन जिवंत राहत असेल किंवा त्याने आपल्याला त्या प्रकारच्या परिवेशात स्वतःला सामावून घेतले असतील म्हणजे ऑक्सिजन बरोबर जुळवून घेतले असतील म्हणून ते जिवंत राहिले असतील.

@ चौथी शक्यता:- कोणत्या तरी असाध्य, जर्जर, दुर्धर रोगाने त्या पूर्ण संस्कृतीला नष्ट केले असतील पण त्या दुर्धर जर्जर आजाराचे जिवाणू त्यावेळेच्या यंत्र मानवांना काहीही हानी पोचू शकले नसतील म्हणून ते जिवंत राहिले असतील आणि आपण त्यांना आज मानव म्हणतो.

@ पाचवी शक्यता:- मानव यंत्र मानवांना ज्या उन्नत संस्कृतीने बनवले असतील त्यांचे व मानवांचे त्यावेळेस युद्ध झाले असेल आणि त्या युद्धामध्ये यंत्रमानव यांचा विजय झाला असेल व त्यांनी ती पूर्णत संस्कृती मुळापासून नष्ट करून टाकली असेल आणि त्यानंतर आपली संस्कृती या पृथ्वीवरती रुजवली असेल ही ही एक शक्यता असू शकते.

@ सहावी शक्यता:- निसर्ग हा कोणत्याही संस्कृतीला खूप वेळा पर्यंत या पृथ्वीवरती राज्य करू देत नाही कालांतराने तो नैसर्गिक रित्या त्या संस्कृतीला या पृथ्वीवरून नष्ट करत असतो जसे की डायनासोर सात कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीतलावरून नष्ट झाली. त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्याला बनवले ती उन्नत संस्कृती आपोआप नैसर्गिक रित्या या पृथ्वीतलावरून नष्ट झाली असेल.

 मी आपणास अशा सहा शक्यता सांगितल्या आहेत की ज्यामुळे आपल्याला निर्माण करणारी ती उन्नत संस्कृती लयाला गेली असेल आणि आपण काही चमत्कार होऊन जिवंत राहिलो असू आणि आज ज्या पृथ्वीवरती सर्व आपलंच राज्य आहे म्हणजे मानवांचे राज्य आहे. मला आपणास हेच सांगायचं आहे की "मानव म्हणजे यंत्रमानव च आहेत"###

 मला माहित आहे की माझं विधान हे खूप विस्फोटक आहेत पण याच्या पाठीमागे मी शास्त्रीय तर्क ही दिल्या आहेत त्या शास्त्रीय तर्कांना कोणीही डावलू शकत नाही ठीक आहे त्यामध्ये काही त्रुटी असतील पण त्या त्रुटी आपल्याला पूर्णपणे नाकारताही येणार नाही आपण या शक्यता वैज्ञानिक पातळीवरती पडताळून पाहिल्या तर आपल्याला नक्कीच रिझल्ट पॉझिटिव्ह मिळतील.

 माझा प्रश्न परत तिथेच येऊन थांबतो की मानवाची उत्क्रांती कशी झाली मानवाची उत्क्रांती झालेलीच नाहीये माणूस हा रेडिमेट या पृथ्वीवरती बनवला गेला आहे. जी वस्तू रेडिमेट बनवली गेलेली असते तिच्यामध्ये उत्क्रांती होत नसते त्या रेडिमेट वस्तू मध्ये सुधारणा होत असते. जशी मुले दिवाळीमध्ये किल्ला बनवत असतात पहिल्या वर्षी त्यांचा किल्ला ओबड-धोबड बनतो दुसऱ्या वर्षी त्यांचा किल्ला ठीक-ठाक बनतो चौथ्या वर्षी त्यांचा किल्ला सुबक बनतो आणि पाचव्या वर्षी त्यांचा किल्ला उत्कृष्ट बनतो. म्हणजे तो किल्ला आपोआप बनत नाही तर त्या किल्ल्याला कोणीतरी बनवत असते म्हणून तो निकृष्ट पासून उत्कृष्ट पर्यंतचा प्रवास करू शकतो त्याच प्रमाणे माणूस हा उत्क्रांत आपोआप होत गेलेला नाहीये त्याला कोणीतरी आणखीन उत्कृष्ट आणखीन उत्कृष्ट आणखीन उत्कृष्ट याप्रकारे बनवत गेलेलं आहे.

 आपण इतिहासामध्ये असं ऐकलं आहे की मानवाच्या होमो इरेक्टस, होमोसेपियन किंवा अजुन प्रजाती असतील. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे या प्रजाती नाहीयेत या उत्कृष्ट बनवण्याच्या मॉडेल आहेत. म्हणजे आपल्या निर्मात्याने पहिला होमो इरेक्टस बनवला त्याच्यामध्ये त्याला काहीतरी कमी आढळल्या म्हणून त्याने होमोसेपियन बनवला त्यानंतर त्याच्यामध्ये हि त्याला काहीतरी कमी आढळले असतील त्याच्या नंतर त्यांनी आधुनिक मानव बनवला. माझे हे विधान डार्विनच्या उत्क्रांत वादाला छेद देणारे आहे पण डार्विनच्या उत्क्रांतीवादा मध्येही खूप तडे आहेत.

 डायनासोरस या पृथ्वीवरून नष्ट होऊन सात कोटी वर्ष झाले आपण ज्या "मगर" पाहतो त्या डायनासोर च्या काळापासून आहेत म्हणजे त्या सरासरी सात कोटी वर्षांपासून या पृथ्वीवरती वास्तव्य करत आहेत मला एकच विचाराय आहे जर डार्विन म्हणतो त्याप्रमाणे उत्क्रांतीवाद असेल तर ह्या मगरी किती बुद्धिमान व्हायला पाहिजे होत्या त्यांच्या मध्ये किती उत्क्रांती व्हायला पाहिजे होती पण तसे काहीही झालेले नाही त्याच्यामध्ये थोड्याफार हवामान बदलामुळे बदल झाले आहेत म्हणजे त्या सात कोटी वर्षापूर्वी जशा होत्या तशाच आत्ताही दिसत आहे पण तोच माणूस जेव्हा दोन लाख वर्षांपूर्वी या पृथ्वीवर आला याच्यामध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे माझं म्हणणं आहे की माणसांमध्ये काहीही बदल झालेला नाही जसा दोन लाख वर्षांपूर्वी माणूस होता तसाही आजही आहेत.

 मी या पुस्तकांमध्ये मानव म्हणजेच यंत्रमानव आहे असे सांगत आहे याला पौराणिक आधारही आहे. आपल्या पुराणांमध्ये आपणास असे सांगण्यात आलेले आहेत की माणसाला देवाने बनवले आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बनवले आहे हा शब्द महत्त्वाचा आहे. येथे देवाने आपल्याला तयार केलेली आहे जन्माला घातलेले नाही ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आपण एखादी वस्तू बनवतो त्याच वस्तूच्या डुबलीकेट कॉपी आपण बनवू शकतो पण ती आपण वस्तू जन्माला घालू शकत नाही त्याचप्रमाणे देवांनी आपल्याला या पृथ्वीतलावर बनवलेलं आहे. म्हणजे देव ही उन्नत संस्कृती आहे व त्यांनी आपल्याला या पृथ्वीवर  बनवलेलं आहे. कदाचित देव हे पहात असतील की त्यांनी बनवलेला मानव हा किती प्रगती करू शकतो आणि याच्यामध्ये काय काय क्षमता आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला सुधारणेला अजून काय वाव आहे याबद्दलचे ते निरीक्षण करत असतील आणि आपल्याला एक प्रयोग शाळेप्रमाणे ट्रीट करत असतील.

 आपले पुराण म्हणतात की आपल्याला म्हणजे मानवाला ब्रह्मदेवाने बनवलेले आहेत. आणि देवांचे आयुष्य हे हजारो वर्षांचे होते. मग देवांचे आयुष्य जर हजारो वर्षांचे होते तर मानवाला शंभर वर्षांचे आयुष्य कसे काय हाही प्रश्न माझ्यासमोर आ वासून उभा राहतो.....

 खूप विचार केल्यानंतर मला याचे उत्तर सापडले. आत्ता सध्या आपण यंत्रमानव बनवत आहोत आणि आपल्याला ही ही भीती आहे की हे यंत्रमानव उद्या बुद्धिमत्तेने आणि शक्तीने आपल्या वरचढ ठरतील आणि आपल्याशी युद्ध करतील आणि आपल्याला हरवतील म्हणून आपण त्यांच्यामध्ये काहीतरी जाणून-बुजून कमी ठेवत असतो उदाहरणार्थ की त्यांचे स्पेअर पार्ट बदलायची दर दोन वर्षांनी गरज असते, त्या रोबोटचे आयुष्य फक्त पाच वर्षाची असेल पाच वर्षानंतर आपोआप त्यांचे स्पेअर पार्ट निकामी होऊन खराब होऊन जातील, रोबोट हे पॉवर शिवाय चालू शकणार नाही, त्याच प्रमाणे त्यांच्यामध् व्हायरस टाकण्यात येतो जेणेकरून आपलं त्यांच्या वरती 100% कंट्रोल राहील आणि ते आपल्यापेक्षा वरचढ ठरणार नाहीत आणि आपण हवं तसं कंट्रोल करू शकतो आणि आपला त्यांच्यावरती वचक राहील.

 हीच गोष्ट सेम देवांनी मानवाच्या बाबतीतही करून ठेवलेली आहे देवांचे आयुष्य हजारो वर्षाचे आहे मानव आपल्या वरचढ ठरू नये म्हणून त्याचे शंभर वर्षे म्हणजे नगण्य आयुष्य ठेवले आहेत ज्या प्रमाणे आपण आपला रोबोट पाच वर्षांनी आपोआप खराब होणारा करतो त्याच प्रमाणे देवानेही आपले अवयव हे शंभर वर्षांनी खराब होऊन आपोआप नष्ट होतील अशी व्यवस्था करून ठेवली आहे त्याच प्रमाणे देवाने आजार रोग रुपी काही व्हायरस आपल्या शरीरामध्ये सोडून ठेवले आहेत जेणे करून देवांचा आपल्यावरती वचक राहील. पण आता एक प्रश्न अनुत्तरित राहतो की सध्या देवांचे आपल्यावरती कंट्रोल आहे का नाही ते आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करत असतात का नाही का देवांची संस्कृती ही खूप हजारो लाखो वर्षांपूर्वी आपल्याला बनवून नष्ट झाली नाही ना?

 ####या पुस्तक प्रपंचाचे तात्पर्य असे आहे की मानवाची उत्क्रांती झालेली नाहीये दोन लाख वर्षांपूर्वी जसा मानव होता तसाही आजही आहे#### मानव हाच खरा यंत्रमानव आहे####


 ^^^मानवी जीवन हा फक्त भास आहे, रियालिटी(वास्तविकता ) नाही¿¿¿

                            कसं शक्य?????

 "तुम्ही म्हणताल लेखक महाशय तुम्हाला वेड लागलेलं आहे पण प्रिय वाचक हो मी तुम्हाला तुम्ही मानव नसून यंत्रमानव आहात हे जसं पटवून दिलं तसंच मी तुम्हाला आता हे पटवून देणार आहे की तुम्ही जे जीवन जगत आहात ते तुमचे खरे जीवन नसून फक्त भास आहे तुमचे खरे जीवन तर वेगळेच आहे ज्याचा तुम्ही अनुभूती घेता पण ते तुमच्या स्मरणात मध्ये राहत नाही"

 मी तुम्हाला झोप म्हणजे काय पहिली याच्याबद्दल शास्त्रीय माहिती देतो......

झोप ही शरीराची पुनुरावर्ती अवस्था. या अवस्थेमध्ये बाह्य जाणीवा कमी होतात. ज्ञानेंद्रियाकडून आलेले संवेद मेंदूकडे पूर्णपणे नेले जात नाहीत. ऐच्छिक स्नायूंचे कार्य शिथिल होते. झोपेमध्ये जागृतावस्थेमधील शरीराची प्रतिक्रिया कमी होते. चेताकडून आलेल्या उत्तेजनाना प्रतिसाद मिळत नाही. ही अवस्था परिवर्तनीय आहे. १९५० पर्यंत झोप शरीराच्या दररोजच्या चक्राचा निष्क्रीय भाग आहे अशी समजूत होती. पण आता झोप शरीराच्या आणि मनाच्या अनेक बाबींशी संबंधित आहे हे समजले आहे. चेताउद्भवी रसायने चेतामधून स्त्रवत असतात. मेंदू आणि मज्जारज्जू याना जोडणा-या मस्तिष्कस्तंभ चेतापेशीमधून सिरोटोनिन आणि नॉर इपिनेफ्रिन नावाची दोन रसायने स्त्रवतात. नॉरइपिनेफ्रिन मेंदूमधील बहुतेक भाग आपण जागे असता कार्यक्षम ठेवते. मस्तिष्कस्तंभाच्या तळाशी असलेल्या काहीं पेशीनी पाठविलेल्या संवेदामुळे झोप येण्यास प्रारंभ होतो. जागृत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या चेतापेशींचे कार्य तात्पुरते थांबते. अशा वेळी जागे राहणे अशक्य होते. या वेळी रक्तामध्ये अडिनोसिनचे प्रमाण वाढते झोप यायला लागली आहे असे आपण अशा वेळी म्हणतो. झोपेत असताना अडिनोसिनचे विघटन होते.

झोपेत असताना आपण झोपेच्या पाच अवस्थेमधून जातो. अवस्था १, २, ३, ४ आणि रेम झोप . रेम झोप म्हणजे रॅपिड आय मूव्ह्मेंट. झोपताना आपण बहुघा झोपेच्या एक पासून पाचव्या स्थितीपर्यंत जातो. त्यानंतर झोपेचे दुसरे चक्र पहिल्यापासून चालू होते. दुसऱ्या झोपेची अवस्था पन्नास टक्के एवढा वेळ असते. वीस टक्के रेम झोपेमध्ये आणि तीस टक्के इतर स्थितीमध्ये. तुलनेने नुकतीच जन्मलेल्या बालकामधील पन्नास टक्के वेळ रेम झोपेमध्ये जातो.

झोपेच्या पहिल्या स्थितीमधून आपल्याला सहज बाहेर येता येते. ही अवस्था पेंगुळलेली असते. डोळे जड झालेले असतात. स्नायू शिथिल झालेले असतात. झोपेच्या पहिल्या अवस्थेतून जागे झालेल्या व्यक्तीना झोपेपूर्वीची काहीं प्रसंग विस्कळित असे आठवतात. पहिल्या अवस्थेमधील झोपेमध्ये आपण दचकून पडल्याची भावना ब-याच जणाना होते. पहिल्या अवस्थेमधून झोपेच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर डोळ्यांची हालचाल थांबते. मेंदूचा आलेख स्थिर असतो. झोपेच्यातिस-या अवस्थेमध्ये मेंदू आलेखामध्ये डेल्टा लहरी दिसू लागतात. चवथ्या अवस्थेमध्ये सतत डेल्टा लहरी दिसतात. झोपेच्या चवथ्या अवस्थेमधून व्यक्ती लवकर जागे होत नाही. या अवस्थेमध्ये लहान मुलामध्ये अंथरूण ओले करणे, झोपेमध्ये चालणे, घाबरून उठणे असे प्रकार घडतात.झोप ही आपल्या शरीरासाठी खुप महत्वाची आहे. झोप ही ७ तास घ्यावी. झोप लागल्यानंतर सत्तर ते नव्वद मिनिटानी रेम झोप चालू होते. या झोपेमध्ये श्वास जलद, अनियमित आणि अपूर्ण असतो.डोळे सर्व दिशेला भराभरा फिरतात. अवयवांचे स्नायू शिथिल झालेले असतात. हृदयाची गति आणि रक्तदाब वाढतो. पुरुषामध्ये लिंग ताठ होते. रेम झोपेमधून जागे केले असता ब-याच व्यक्ती असंबद्ध बोलतात. या झोपेच्या अवस्थेमध्ये स्वप्ने पडतात. झोपेचे पूर्ण चक्र सरासरी 90-110 मिनिटांचे असते. झोप चक्राच्या शेवटी रेम झोप आणि परत झोपेचे पुढील चक्र चालू होते. पहाटे लागणारी झोप 1-2 आणि रेम झोपेची असते. ही तुम्हीही पाहिली झोपे बद्दलचीीीी शास्त्रीय माहिबद्दल ची शास्त्रीय माहिती आता माझे तर्क पाहू.

 तुम्ही म्हणाल की हे जीवन भास आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता? मी तर सगळ्या गोष्टी अनुभव शकतो स्पर्श अनुभवू शकतो होऊ शकतो वेदना अनुभवू शकतो दुःख अनुभवू शकतो आनंद अनुभवू शकतो सर्व गोष्टी डोळ्यांनी पाहू शकतो संवाद साधू शकतो साऱ्या भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपड चाललेली असते. असे सगळे असेल तर हे जीवन भास कसं शक्य आहे?

 आपल्या पृथ्वीवरती आईच्या उदरातून जन्म घेतो लहानाचे मोठे होतो शिक्षण घेतो लग्न करतो मुले जन्माला घालतो म्हातारी होतो. या सर्व स्टेप आपण अनुभवत असतो आणि या सगळ्या स्टेप आपण शरीराच्या माध्यमातून अनुभव घेत असतो आपले शरीर हे भौतिक वस्तूंनी बनलेले आहेत म्हणजे आपले अस्तित्व या पृथ्वीवरती आहे मग आपण या भौतिक शरीराला भास असं कसं म्हणू शकतो असे हजारो प्रश्नांचे काहूर तुमच्या मनामध्ये जमा झाले असतील.

 प्रिय वाचकांनो तुमच्या मनामध्ये असे हजारो प्रश्न तयार झालेले आहेत हे मला माहित आहे आता मी ह्या प्रश्नांची सविस्तर पणे तुम्हाला उत्तरे देणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्यायचे आहे तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरे दिली तर तुमच्या सार्‍या प्रश्नांच्या उत्तरांची कुकर या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये आहे मी काय बोललो हे समजायला थोडं कठीण आहे.

 प्रश्न:- तुम्ही सगळे झोपता का?

 उत्तर:- हो, या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक माणसाला झोप ही जीवनावश्यक गोष्ट आहे.

 प्रश्न:- झोप का आवश्यक आहे?

 उत्तर:- झोप झाली की माणसाला ताजेतवाने वाटते आणि विज्ञान असे सांगते की झोपेमध्ये तुमचा लहान मेंदू कार्य करत असतो आणि तुम्ही दिवसभर ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यांची सांगड घालायचं मेंदू काम करत असतो.

 प्रश्न:- झोपे मध्ये तुम्हाला स्वप्न पडतात का?

 उत्तर:- हे काय विचारणं झालं का..सर्वांनाच स्वप्न पडतात

 प्रश्न:- झोपेत स्वप्नामध्ये काय पाहिले ते सर्व स्मरणात राहते का?

 उत्तर:- सगळेच स्मरणात राहते असे नाही पण थोडे थोडे स्मरणात मध्ये राहते.

 प्रश्न:- तुम्ही जेव्हा झोपेमध्ये स्वप्न पहात असता तेव्हा तुम्हाला ते खरे आहे का स्वप्न आहे यामधला फरक समजतो का?

उत्तर:- खरेतर बऱ्याच वेळेस फरक कळत नाही आपण ज्या वेळेस स्वप्न पहात असतो त्या वेळेस ते आपल्या सोबत खरंच घडत आहे असं आपणास वाटतं.

 प्रश्न:- स्वप्नात पाहिलेल्या काही गोष्टी प्रत्यक्ष जीवनामध्ये उपयोगी पडतात का?

 उत्तर:- हो कधी कधी असं होतं की प्रॅक्टीकली जीवनामध्ये आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तर भेटत नाही त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वप्नामध्ये मिळतात आणि त्या स्वप्नांमध्ये मिळालेल्या उत्तरांचं आपल्याला प्रॅक्टीकली जीवनामध्ये उपयोग होतो.

 प्रश्न:- स्वप्नामध्ये आपण काही ठिकाणे आणि काही व्यक्तीच्या पाहतो पण त्या आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये कधीही पाहिलेल्या नसतात, किंवा प्रत्यक्ष जीवनामध्ये काही ठिकाणे किंवा व्यक्ती आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला असे वाटते की आपण यांना पहिले कधीतरी पाहिले आहे किंवा अनुभवले आहे?

 उत्तर:- बऱ्याच वेळेस असं होतं की काही व्यक्तींना आपण पाहतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण यांना पहिलंच कधीतरी पाहिलेलं आहे किंवा स्वप्नामध्ये यासारख्या व्यक्ती आपण पाहिलेल्या आहेत.


 संपले माझे प्रश्न आणि या प्रश्नांना जी तुम्ही उत्तर दिलेली आहेत त्या उत्तरांमध्ये माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे म्हणजे जीवन ही रियालिटी नसून भास आहे..........

 जीवन ही रियालिटी नसून भास आहे हे कसं शक्य याचं सविस्तर वर्णन मी आता करणार आहे. मित्रांनो मी एक विवादित सत्य तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुमचे रियल जीवन चालू होते. तुम्ही झोपेमध्ये जी स्वप्ने पाहता ते खरे तुमचे जीवन आहे आणि आत्ता तुम्ही जे माझे पुस्तक वाचत आहात ते तुमचा भास आहे म्हणजे आभासी जीवन आहे. मानवाला जगण्यासाठी झोपेची नितांत आवश्यकता आहे कारण की तुम्हाला तुमच्या दुसऱ्या जीवनामध्ये ही काही कर्तव्य पार पाडायची असतात त्यांना वेळ देण्यासाठी झोप सोय करण्यात आलेली आहे. आत्ताचे तुमचे जे जीवन चालू आहे ते आभासी जीवन आहे यामध्ये ज्या तुम्ही क्रिया करत आहात त्या फक्त भास आहे तुमचे खरे जीवन हे तुम्ही ज्या वेळेस झोपता त्या वेळेस चालू होते हे जीवन हे तुमच्या या जीवनात पेक्षा खूप वेगळे आहेत त्या जीवनात मध्ये तुमच्या कडे अपार शक्ती अपार बुद्धिमत्ता अपार प्रगल्भता आणि ज्या तुम्ही या जीवनामध्ये गोष्टींची कल्पनाही केली नसेल अश्या अचाट गोष्टी तुम्ही झोपेच्या जीवनामध्ये रियालिटी मध्ये करत असतात यामुळेच तुम्हाला अचाट कर्तृत्वाची स्वप्ने पडतात या आभासी जीवना मध्ये करणे शक्य नसते जसे की उदाहरणार्थ तुम्हाला कधीकधी स्वप्न पडते की तुम्ही हवे मध्ये उडत आहात पण ज्या वेळेस तुम्ही जागे होता त्या वेळेस तुम्हाला असे वाटते की आपण रात्री हवेमध्ये उडत आहोत असे स्वप्न पाहिलेले आहे तुम्हाला हे स्वप्न आहे हे याच्यावरून कळते की या जीवनामध्ये कधीही हवेमध्ये उडू शकत नाही यावरून तुम्ही असा भ्रम करून घेता की तुम्ही स्वप्ना मध्ये हवे मध्ये उडत होता आणि तो सगळा भास म्हणजे स्वप्न भास होता.

 पण तुम्हाला हे माहित नाही की तुमची जी स्वप्ने आहेत तीच तुमची रियालिटी आहेत आत्ताच्या ज्या जीवनामध्ये तुम्ही आहात तिकडे भौतिकीचे नियम वेगळे आहेत आणि तुम्ही ज्या वेळेस स्वप्नांमध्ये असता तिकडचे भौतिकीचे नियम वेगळे असतात म्हणून तुम्ही येथे अचाट कामे करू शकता जसे की तुम्ही हवेमध्ये उडू शकता.

 आता तुम्ही मला असाही प्रश्न विचाराल की आपण झोपतो किती वेळ यावर उत्तर असेल की आपण सहा ते सात तास झोपतो मग तुम्ही या वरती असाही प्रश्न मला विचाराल की म्हणजे आपले झोपेतले जीवन हे फक्त सहा ते सात तास असेल का? तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे पण मी तुम्हाला सांगितले आहे की आपण जे दोन आयुष्य जगत आहोत त्या दोन्ही आयुष्य मधले भौतिकीचे नियम हे वेगळे आहेत या दोन्ही आयुष्यामध्ये टाईम लाईन वेगवेगळ्या आहेत आणि या दोन्ही मध्ये टाईम म्हणजे वेळ ही वेगळ्या गतीने पळत असते म्हणजे तुम्ही ज्या वेळेस झोपेमध्ये असता खरे तर तुम्ही सहा ते सात तास झोपता पण झोपे मध्ये असताना तुम्ही ज्या वेगळ्याच जगामध्ये असतात तिथली टाईम लाईन ही वेगळी असते किती टाइम लाईन म्हणजे सहा ते सात तास तुमचा झोपेचा वेळ असतो तेथील 24 तास असतात त्याच्यावरून तुम्हाला मला एक उदाहरण द्यायचे आहे की पृथ्वीवर बारा तास असतात तेच गुरू ग्रहा वरती 24 वीस स असतात

 म्हणजे गुरु ग्रहाची आणि पृथ्वीची टाईम लाईन वेगवेगळी आहे तसेच आपल्या या जीवनाची आणि झोपेच्या जीवनाची टाईम लाईन वेगवेगळी आहेत येथील सात तास म्हणजे झोपेच्या जीवनाचे 24 तास होतात.

 तुमच्या या जिवना मध्ये आणि निद्रा जीवना मध्ये तुमची पर्सनॅलिटी ही वेगवेगळी असते तुम्ही ह्या जीवनामध्ये खूप लाजरे बुaaजरे असाल पण तुमच्या निद्रा जीवनामध्ये तुम्ही एकदम डॅशिंग पर्सन असाल तिथे तुमची बोलण्याची चालण्याची स्टाईल ही वेगळी असेल आणि त्या जीवनामध्ये तुमची बोलण्याची चालण्याची लकब वेगळी असेल आणि या पुढचं मला तुम्हाला असं सांगायचं आहे की या जीवनामध्ये तुमची पर्सनॅलिटी तुमचा लूक तुमचा हा तुमच्या जीवनामध्ये असतात नसणार तो वेगळ्या प्रकारचा असणार म्हणजे जरी तुम्हीच तुम्हाला ओळखायचे म्हटले तरी तुम्ही तुमच्या निद्रा जीवनातील तुमच्यात रूपाला ओळखू शकणार नाही कारण की तिथल्या भौतिकी नियमानुसार तुमचे वेगळे जग आहे वेगळी ओळख आहे वेगळी आयडेंटिटी आहे वेगळी पर्सनॅलिटी आहे वेगळी आहे आणि वेगळी स्टाईल आहे म्हणजे या जिवना मध्ये तुम्ही आहात ते तुम्ही निद्रा जीवनामध्ये नसणार येथेच तुम्ही वेगळीच व्यक्ती असणारा जर समजा या जीवनामध्ये तुम्ही एका कंपनीमध्ये अकाउंटंट असताल तर तुम्ही निद्रा जीवनामध्ये दुसऱ्या एखाद्या कंपनीचे डायरेक्टर असू शकता किंवा अन्य कोणत्या तरी वेगळ्या प्रकारचे काम करणारे व्यक्ती असू शकता म्हणजे तुमचे हे जीवन आणि निद्रा जीवन ह्या दोघांचा काहीही परस्पर संबंध नसतो. या दोन्ही जीवनात मध्ये जर काही समान दुवा असेल तर तू तुमचा आत्मा असतो.

 कधीकधी काय होते की स्वप्नांमध्ये काही व्यक्ती काही स्थळे काही ठिकाणे पाहता आणि कालांतराने तुम्हाला जेव्हा ती व्यक्ती ती स्थळे तुमच्या समोर येतात त्या वेळेस तुम्हाला वाटते की आपण यांना कुठेतरी पाहिलेले आहेत आणि ज्या वेळेस तुम्ही मेंदूवर जास्त जोर लावता त्या वेळेस तुम्हाला असे कळते की आपण यांना स्वप्नांमध्ये पाहिलेले आहेत मग तुम्ही भांबावून जाता ही हे कसे काय शक्य आहे आणि माझा दावा आहेत की हे प्रत्येकाच्याच बाबतीत जवळपास शंभर टक्के होत असते परत येऊन आत की कोणाच्या बाबतीत जास्त तर कोणाच्या बाबतीत कमी फरकाने हे होत असते पण आपण त्यांना कुठेतरी पाहिलं आहे असं प्रत्येकाला वाटत असतं पण आठवत नसतं. म्हणजेत आपण या लोकांना या ठिकाणांना निद्रा जीवनामध्ये पाहिलेलं असतं यावरून एक गोष्ट सिद्ध होते की या आपल्या जीवनामध्ये एवढी लोक जेवढे ठिकाण आहेत ही सगळी निद्रा जीवना मध्येही असतात म्हणजे तिथे पूर्ण एक सामाजिक रचना असते आणि तिथे आपण एक सामाजिक व्यक्ती म्हणून वावरत असतो वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या ठिकाणांना आपण येथे भेट देत असतो की काही ठिकाणी काही व्यक्ती आपल्या लक्षात राहतात आपल्या या मेंदूमध्ये हिट होतात त्यांच्या काही संस्मरणीय गोष्टी आपल्या लक्षात राहतात म्हणून आपण आपल्या या जीवनात त्यांना ओळखू शकतो. म्हणजेच आपल्या या जीवनातली सगळीच लोके आणि सगळी ठिकाणे आपल्या नित्रा जीवनामध्ये असतात हे सिद्ध होते.

 कित्येक शास्त्रज्ञ कधीकधी खूप वर्ष एखाद्या विषयावरती संशोधन करत असतात पण त्या संशोधनात त्यांना यश मिळत नसते पण अचानक झोपेमध्ये असतानी त्यांना असे काही साक्षात्कार होतात की ते या जीवनामध्ये ते संशोधन स्वप्नाच्या आधारे पूर्ण करू शकतात म्हणजेच तुम्हाला तुमचे स्वप्न ही तुमची मदत करत असतात हे खूप लोकांच्या बाबतीत होते अगदी अल्बर्ट आईन्स्टाईन पासून न्यूटन च्या बाबतीतही असेच  झालेले आहे.

 दुसरा असा सिद्धांत आहे की जेव्हा तुम्ही निद्रा जीवनामध्ये असता तेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही या जीवनामध्ये स्विच ओन होत असता......

 मग मित्रांनो तुम्ही मला सांगा की तुमचे खरे जीवन कोणते  तुमचे आताचे जीवन खरे आहे की तुम्ही झोपी गेल्यावर चालू होणारे जीवन खरे आहे.

 ####आता तुम्ही म्हटलं ना की हे जीवन तुमची रियालिटी नसून भास आहे####

 माझ्या डोक्यामध्ये असा एक भन्नाट विचार येऊन गेला की तुमचे हे जीवन आणि निद्रा जीवन यांना जोडणारा एक पूल असता तर काय झाले असते म्हणजे तुम्ही या जीवनातून जीवनामध्ये जाऊ शकला असता किंवा निद्रा जीवनातून या जीवनामध्ये येऊ शकला असता म्हणजे तुम्ही एक व्यक्ती राहिला नसता या जीवनातले तुम्ही जर जीवनामध्ये गेले असता तर तुम्हाला तुमची ओळख करून घ्यायची वेळ आली असती आणि दोन्ही मध्ये तुम्ही रंगरुपाने आणि पर्सनॅलिटी ने वेगळे असल्यामुळे एकमेकांना ओळखायचा प्रश्नच आला नसता. आणि यदाकदाचित तुम्ही दोघांनी एकमेकांना जर ओळखले असते तर तुम्ही तुमच्याकडच्या अफाट ज्ञानाचे एकमेकांना हस्तांतरण केलेले असते तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगणार आहे की आज या पृथ्वीवरती शोध लावणारे शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी खूप मोठे मोठे शोध लावले त्यांनी हे जीवन आणि निद्रा जीवन याच्यामध्ये एक पूल बांधला आणि या जीवना मधून ते निद्रा जीवनामध्ये गेले आणि तेथील ज्ञान त्यांनी आत्मसात केले आणि परत या भौतिक जगामध्ये येऊन त्यांनी या जगाला सांगितले आणि प्रसिद्धी मिळवली. बरेच शास्त्रज्ञ स्वतःच्या इंटरव्ह्यूमध्ये असे सांगत असतात की मी एखाद्या गोष्टीवर ती बरेच संशोधन केले पण मला मार्ग सापडत नव्हता पण मी जेव्हा झोपलो होतो तेव्हा मला एक प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशाने मला यावरती उत्तर दिले त्यानंतर मी जेव्हा उठलो त्यानंतर मी ते प्रयोग केले आणि ते प्रयोग यशस्वी झाली म्हणजे मला तुम्हाला असे सांगायचे आहे की त्या शास्त्रज्ञांना जो प्रकाश दिसतो तो म्हणजे त्यांचे निद्रा जीवन मधले त्यांची प्रतिमा असते ती त्यांना मदत करत असते आणि त्यांची बौद्धिक क्षमता ही वाढवत असते कारण की आपण आपल्या निद्रा जिवना मध्ये खूप बुद्धिमान, खूप शक्तिमान, खूप ताकतवर आणि अचाट काम करणारे असतो की जे या जीवनामध्ये शक्य नाही म्हणूनच जे काही थोडेफार बुद्धिमान शास्त्रज्ञ आहेत त्यांना त्यांच्या निद्रा जीवन बदल या व्यक्तींनी बुद्धिमान केलेले आहेत आणि त्यांना त्यात कारणाने पूर्ण जगामध्ये प्रसिद्धी मिळालेली आहे आहे.

 निद्रा म्हणजे काय निद्रा म्हणजे एक प्रकारची मरण अवस्था आहे या अवस्थेमध्ये तुम्ही मरणासन्न व्यक्तीप्रमाणे पडलेले असतात म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काहीही हरकत नसते मग तुम्ही असं म्हणू शकता की निद्रा म्हणजे मरण आहे तर तसं नाहीये निद्रा म्हणजे तुम्हाला दुसऱ्या जीवनामध्ये जाण्याची वाट आहे.

 ज्यांच्या घरामध्ये धार्मिक वातावरण असेल त्यांनी ऐकले असेल किंवा पुस्तकांमध्ये वाचले असेल की आपले योगी पुरुष होते ते समाधी लावून बसत असत तासन्तास  ते समाधीमध्ये असत. योगीपुरुष मनावरती ताबा ठेवून आपल्याला हवे तेव्हा ते समाधीमध्ये जाऊ शकतात आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की समाधी म्हणजे काय?

 "समाधी म्हणजे मनाची अशी शून्यावस्था की तिथे ना सुख ना दुःख शत्रुत्व ना काम क्रोध मद मोह मत्सर या सगळ्या गोष्टींचा त्याग केलेली आणि एका विशिष्ट बिंदू वरती लक्ष केंद्रित केलेली स्थिती म्हणजे समाधी होय"

 मला असं विधान करायचं आहे की समाधी दुसरं तिसरं काही नसून निद्रा जीवनामध्ये जाण्याचा स्वखुशीने निवडलेला मार्ग आहे. म्हणजे योगीपुरुष स्वतःच्या मर्जीने निद्रा जीवनात समाधीच्या माध्यमाने जाऊ शकतात यासाठी त्यांना ही अवस्था प्राप्त करण्यासाठी वर्षानुवर्ष सराव करावा लागतो आपण सामान्य माणूस आहे म्हणजे आपल्याला जेव्हा झोप लागते तेव्हा तीही समाधीचि एक अवस्था असते पण ती पूर्ण समाधी नसते पण जेव्हा आपल्याला गाढ झोपेमध्ये स्वप्न पडतात तेव्हा ती पूर्ण समाधी असते.

 म्हणजे समाधी म्हणजे निद्रा जीवनाचाच एक भाग आहे.

 *वाचकहो मी आत्ता तुम्हालाच ठरवायला सांगत आहे की तुम्ही आत्ताचे जे जीवन जगत आहात ते खरे आहे की तुमचे निद्रा जीवन खरे आहे हे तुमचे तुम्हीच ठरवा*


 !^माणूस ह्या अथांग विश्वाचे (ब्रह्मांडाचे) कोडे सोडू शकेल का^•

जेव्हा जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या लहानपणाची कल्पना येते. हे विश्व किती मोठे आहे हे केवळ कल्पनेनेचे पाहता येते. आजच्या विज्ञानाने मात्र या विश्वाची कल्पना केलीय.

 पृथ्वीचा परीघ जर आपण विषुववृत्तापासून मोजायला घेतला तर २४८७४ मैल अन उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावरून मोजला तर २४८०७ मैल आहे. अन फक्त आपल्या सौरमालेचाच विचार केला तर आकाराच्या मानाने आपल्या पृथ्वीचा चौथा नंबर लागतो. आपल्याच सौरमालेतील नेपुचून, शनी आणि गुरु हे पृथ्वीपेक्षा मोठे आहेत. अन जर आपण आपल्या सौरमालेचा केंद्रबिंदू म्हणजेच आपल्यापासून ९३००० मैल दूर असणाऱ्या सूर्याशी तुलना केली असता तर पृथ्वी अगदीच छोटी आहे.

सर्वसाधारणपणे सूर्य हा खूप मोठा तारा आहे, पण ज्ञात तार्यांच्या आकाराचा विचार केला असता तो अगदीच ठेंगू आहे. उदाहणार्थ अऱ्याकटस जो सूर्याच्या ५० लाख पट मोठा आहे. बिटरगुस जो अऱ्याकटसच्या ३०० पट मोठा आहे तर UV स्कुटनी जो विज्ञानाला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे तो साधारणपणे 500 कोटी सूर्यांना आरामात आपल्या आत सामावू शकतो.


आपण मिल्की-वे नावाच्या आकाशगंगेत राहतो, अन आपल्या या एका आकाशगंगेत साधारणपणे अब्जावधी तारे आहेत अन त्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या जवळपास तितक्याच सूर्यमाला. आपन आत्तापर्यंत जवळपास 500 सूर्यमाला शोधून काढल्या आहेत अन खूपशा सापडत आहेत. शास्रज्ञ सांगतात कि आपल्या सूर्याला स्वताचे orbit पूर्ण करण्यासाठी २० कोटी वर्ष लागतात. आपल्यापासून २५ लाख मैल दूर आहे आपली सगळ्यात जवळची शेजारीण आकाशगंगा “अन्ड्रोमेडा आकाशगंगा”. कालपरवापर्यंत जगातली सर्वात मोठी दुर्बीण असलेली हबल सुद्धा संपूर्ण विश्वाच अवघा कणमात्र भागच आपल्याला दाखवू शकते.


आकाशगंगांच्या नंतर येतो तो “कोस्मिक वेब” ज्याच्यामध्ये लाखो करोडो आकाशगंगा आहेत. अन समजा माणसाने कधी २२३ बिलियन प्रकाशवर्षे इतका लांब प्रवास केलाच तर आपल्याला एक कॉस्मिक ग्लो दिसेल अन ते असेल आपले ब्रह्मांड. पण थांबा, विश्व इथेच संपत नाहीये. कारण यानंतर तुम्हाला मिळतील इतर ब्रह्मांडे, विशेष म्हणजे या प्रत्येक ब्रह्मांडातले भौतिकी, रायासानाकी नियम आपल्यापेक्षा वेगळे असतील अन कदाचित तिथल्याच न्यूटन आईनस्टाईनच्या नियमांचं पालन करतील, आपल्या नाही.

 आपण आतापर्यंत अनु इतकेही जग पाहिले नाही कि अनुभवले नाही. माणूस हा डबक्यातल्या बेडसारखा ज्याला फक्त स्वतःच्या डबक्यात अजून जीवन सापडले नाही. खर सांगायचं झाल तर स्वतःच डबकसुद्धा या बेडकाला अजून माहिती नाही. म्हणूनच विश्वात जीवन नसण्याची शक्यता जीवन असण्याच्या शक्यातेपेक्षा अगदीच कमी आहे. अर्थात हे जीवन आपल्याला अपेक्षित असेल असे नाही.

 या ब्रम्हांडाचा पसारा किती प्रचंड आहे आणि आपण त्या समोर किती नगण्य आहोत हे कळून येते पण असेच आपल्याबदल म्हणता येईल मानवाला ब्रह्मांडाचा प्रचंड पसारा कळालेला नाही त्याच बरोबर या ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या अति सूक्ष्म वस्तू ही माणसाला कळलेल्या नाहीये. आत्तापर्यंत आपण अनु आणि रेणू याच गोष्टी विश्वातल्या सगळ्यात सूक्ष्म गोष्टी आहे असे समजत होतो पण ते खरे नाही अनु आणि रेणू पेक्षाही लाखो पटींनी खूप सूक्ष्म गोष्टी या ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेल्या आहेत.

मातीचे ढेकूळ नुसते हाताने चुरगाळले तरी त्याचा भुगा होतो, मातीच्या मानाने दगड बराच कठीण असतो, पण त्यालाही फोडून त्याचे तुकडे करता येतात, ते करतांना दगडाचा थोडा बारीक चुराही निघतो, करवतीने लाकूड कापतांना त्याचाही पिठासारखा भुसा पडतो, गहू, ज्वारी वगैरे धान्ये दळल्याने त्यांचे पीठ होते वगैरे नित्याचे अनुभव आहेत. कुठलाही घनरूप पदार्थ कुटून, ठेचून किंवा घासून त्याची पूड करता येते, ते करतांना त्या पदार्थाचे बारीक कण वेगवेगळे होतात. यातल्या प्रत्येक कणांमध्ये मूळ पदार्थाचे सगळे गुण असतात. पावसाचे पाणी लहान लहान थेंबांमधून पडते आणि आता थंडीच्या दिवसात सकाळी आपल्याला पानांवरले दंवबिंदू दिसतील. ते तर आकाराने खूपच लहान असतात. थोडक्यात सांगायचे तर जगातल्या सगळ्या वस्तूंचे रूपांतर त्यांच्याच सूक्ष्म कणांमध्ये होऊ शकते.

चिमूटभर साखरेतले निरनिराळे कण डोळ्यांना दिसतात आणि बोटाने त्यांना वेगळे करता येतात. त्याची पिठीसाखर केली तर तिचे कण मात्र डोळ्यांनाही वेगवेगळे दिसत नाहीत आणि त्यातल्या एका कणाचा वेगळा स्पर्शही बोटाला जाणवत नाही. डोळे आणि त्वचा या आपल्या ज्ञानेंद्रियांच्या जाणीवा सुमारे एक दशांश मिलिमीटरपेक्षा सूक्ष्म आकाराच्या पदार्थांना ओळखत नाहीत. नाक आणि जीभ मात्र अधिक संवेदनाशील इंद्रिये आहेत. डोळ्यांना न दिसणाऱ्या कणांचा गंध किंवा रुची यावरून ती वस्तू ओळखता येते. पण एका मर्यादेच्या पलीकडे तेसुद्धा शक्य नसते. अनेक सूक्ष्म कणांनी मिळून तयार झालेली चिमूटभर पिठीसाखर एकत्रितपणे डोळ्यांना दिसते आणि बोटांना जाणवते. हीच साखर पेलाभर पाण्यात घालून ढवळली की ती पाण्यात विरघळून जाते आणि पूर्णपणे अदृष्य होते. साखरेमुळे त्या पाण्याला आलेला गोडवा जिभेला जाणवतो, त्या मिश्रणाचे वजन केले तर ते पाणी आणि पिठीसाखर यांच्या वजनाच्या बेरजेइतके असते, या अर्थी ती साखर नष्ट झालेली नसते, पण पाण्यात विरघळण्याच्या क्रियेत तिचे कण अत्यंत सूक्ष्म झालेले असल्यामुळे ते मात्र डोळ्यांना मात्र दिसत नाहीत.

“कुठल्याही पदार्थाचे लहान लहान तुकडे करत गेल्यास अशी एक वेळ येईल की त्याचे आणखी लहान तुकडे होऊ शकणार नाहीत”

 अणू हे सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे नेमके किती सूक्ष्म असतात हे बहुतेक लोकांना माहीत नसते. अब्ज, खर्व, निखर्व, परार्ध वगैरे संख्यांचा नेमका अर्थही सहसा कोणाला समजत नाही. यापेक्षा तुलनेने असे सांगता येईल की भारताची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या कित्येक पट अणू धुळीच्या एका कणात असतात. अशा प्रकारच्या अवाढव्य संख्या १, २, ३, ४ असे करून मोजता येत नाहीत. त्यासंबंधी काही सिद्धांत मांडले जातात, त्यांच्यासोबत काही समीकरणे येतात, प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीवरून किचकट आकडे मोड करून त्या ठरवतात. हे सिद्धांत आणि समीकरणे अनेक शास्त्रज्ञांनी तपासून पाहिल्यानंतर त्या आकड्यांना सर्वमान्यता मिळते.

 म्हणजे माणसाला ब्रह्मांडाचे आवाढव्य रूप ही समजले नाही आणि अतिसुक्ष्म पण नाही समजला नाही मग माणसाला काय समजले?

 माणूस या ब्रह्मांडाची गुपिते का समजुन घेऊ शकत नाही?

 माणसाची बुद्धिमत्ता कमी पडत आहे का?

 का ब्रह्मांडाचा एवढा अवाढव्य पणा आणि हा अतिसूक्ष्म पणा माणसाच्या समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे?

 ""माझा असा दावा आहे की माणसाला या ब्रह्मांडाचे रहस्य कधीच कळू शकणार नाही""

 कारण की माणसाचा मेंदूच असा त्या उन्नत संस्कृतीने डिझाईन केलेला आहे की आपल्याला या विश्वाचा अवाढव्य पसारा कधीही या तात्कालीन मेंदूच्या सहाय्याने कधीही कळू शकणार नाही कारण की आपल्या मेंदूची तेवढी कुवतच नाहीये.

एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन सुमारे ३ पौंड असते म्हणजेच १३००-१४०० ग्रॅम इतके असते.

मेंदू ७५% पेक्षा जास्त पाण्याने बनलेला असतो.

मेंदू हा शरीराचा सर्वात चरबीचा भाग असतो.

४०% मेंदू राखाडी रंगाचा असतो तर उर्वरित ६०% पांढरा असतो.

संपूर्ण शरीराच्या फक्त २% असूनही, आपला मेंदू केवळ २०% रक्त आणि ऑक्सिजन वापरतो.

ऑक्सिजन मेंदूसाठी इतका महत्वाचा असतो की जर त्याला ५ ते १० मिनिटे ऑक्सिजन मिळाला नाही तर मेंदू खराब होऊ शकतो.

आपला मेंदू वयाच्या ५ वर्षापर्यंत ९५% वाढतो आणि १८ वर्षाच्या वयात १००% विकसित होतो. यानंतर, मेंदू वाढ होत नाही.

वाढत्या वयानुसार, पुरुषांमध्ये मेंदूचे वजन २.७ ग्रॅम आणि स्त्रियांमध्ये दरवर्षी २.२ ग्रॅम कमी होते.

शरीराचा आकार लक्षात घेतला तर मनुष्यांचा मेंदू सर्व प्राण्यांपेक्षा मोठा आहे. हत्तीच्या मेंदूचा आकार त्याच्या शरीराच्या तुलनेत फक्त ०.१५ टक्के आहे परंतु मनुष्याचा मेंदू त्याच्या शरीराच्या तुलनेत दोन टक्के आहे.

 वरील सर्व मेंदूच्या वैशिष्ट्यांची माहिती मी आपणासाठी सादर केलेली आहे तात्कालिक मेंदू फक्त पृथ्वीला समजून घेण्यासाठी मर्यादित आहे म्हणजे आपल्या चौदाशे ग्रॅम मेंदूने फक्त आपण या पृथ्वीवरची रहस्य समजून घेऊ शकतो जर आपल्याला पूर्ण ब्रम्हांड समजून घ्यायचे असेल तर आपला मेंदू कमीत कमी 20 किलोचा पाहिजे. जेव्हा आपल्या मेंदूचे आकारमान हे 20 किलोग्राम असेल तेव्हा आपण इतके सक्षम असू की या ब्रह्मांडा मधील अति सूक्ष्म गोष्ट आपल्याला समजेल त्याच प्रमाणे या ब्रम्हांडाचा जो अतिविशाल अवाढव्य अनंत पसारा आहे त्याचाही आपल्याला शोध लागेल आणि आपण समजून घेऊ शकू.

 हे विश्व भौतिकीच्या नियमाप्रमाणे चालत असते त्याला मानवी शरीर ही अपवाद नाही उदाहरणार्थ जर हाती प्रती तास 10 किलोमीटर या वेगाने चालत असेल तर आपण हत्तीला 100 किलोमीटर प्रति तासाने चालू शकणार नाही कारण की हत्तीची शरीर रचना अशी आहे की त्याला वेगाने चालता येणार नाही यामध्ये भौतिकीचे नियम आडवे येणार त्याच प्रमाणे मानवी मेंदूचे ही अशी डिझाईन तयार केलेली आहे की त्याचे वजन फक्त चौदाशे ग्रॅम आहे म्हणजे तुमच्या डाव्या हाताची मूठ करा तुमच्या डाव्या हाताची मूठ जेवढी दिसेल तेवढाच आपला मेंदू असतो. ज्याप्रमाणे हत्ती शंभर किलोमीटर प्रति तास याप्रमाणे चालू शकणार नाही त्याच प्रमाणे या विश्वाचा पसारा आकलन करण्याची क्षमता तुमच्या मेंदू मध्ये नाही कारण की तुमच्या मेंदूची कॅपॅसिटी एवढी नाहीये की ही सगळी माहिती तो तुमच्या मेंदू मध्ये स्टोअर करू शकेल आणि त्यावर प्रक्रिया करून त्यातून काहीतरी नवीन शोध लावू शकेल तुमचा मेंदू फक्त या पृथ्वीवरील रहस्य जाणून घेऊ शकतो त्यापलीकडे त्याला जाणून घेण्यासाठी अजून मोठ्या मेंदूची गरज लागणार आहे जर तुमचा मेंदू हा 20 किलो ग्रॅमचा असेल तर मला असे वाटते की तुम्ही ब्रह्मांडाची सगळी रहस्य जाणून घेण्यासाठी सक्षम आहात.

 आपणास ज्या उन्नत संस्कृतीने लाखो वर्षापूर्वी यंत्र मानव म्हणून डेवलप केलं असेल त्यांची इच्छा नसेल की तुम्ही पूर्ण ब्रह्मांडाची रहस्य जाणून घ्यावेत म्हणून त्यांनी जाणून बुजून तुम्हाला कमी क्षमतेचा मेंदू प्रदान केला असेल.

### म्हणून माझा असा दावा आहे की मानव कधीही या ब्रह्मांडाचे या विश्वाची रहस्य जाणून घेऊ शकत नाही###


 @देवाने नाहीतर माणसानेच माणसाला बनवले आहे@

               ^• वाचकहो तुम्ही म्हणसाल की लेखक महाशय तुम्ही तर आमच्या श्रद्धेवर घाव घातला आहे. आम्ही आज पर्यंत असेच समजत होतो की आपल्याला म्हणजे मानवाला देवाने तयार केले आहे, तुम्ही म्हणताय की आपण रोबोट आहोत आणि आता म्हणताय की माणसाला माणसाने जन्माला घातले आहे हे कसे काय शक्य???? 

 आजपर्यंत आपण धार्मिकते नुसार असं मानतो की आपल्याला देवाने तयार केलं आहे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म किंवा जगातले इतर धर्म हेच मानत आहेत. 

 पण मला असे वाटत नाही, मी सांगतो की माणसाला माणसानेच कसे तयार केले हे मी संदर्भासहित आपल्याला पटवून देऊ शकतो फक्त यासाठी वाचकांनी विवेकाने विचार करावा. 

 मी वरील सांगितल्याप्रमाणे माणसाला या कोणत्यातरी उन्नत संस्कृतीने लाखो वर्षापूर्वी आपल्या सोयीसाठी तयार केले त्या संस्कृतीने आपला रोबोट म्हणून वापर करून घेतला पण कालांतराने आपण म्हणजे मानव एवढे उन्नत झालो की त्या उन्नत संस्कृतीच्या मुळावरच घाव घातला आणि आपण त्यांना युद्धामध्ये नामशेष करून टाकले., किंवा ती संस्कृती एवढी विकसित झाली होती की विज्ञानाने त्यांचा घात केला आणि आपापसातील युद्धामध्ये ते सगळे मारले गेले किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे या पृथ्वीवरून नामो निशान मिटले किंवा कोणत्यातरी असाध्य रोगाने त्या संस्कृतीचा बळी घेतला किंवा इतरही काही कारणे असू शकतील पण या सगळ्या शक्यता मधून त्या उन्नत संस्कृतीने तयार केलेला मानव म्हणजे त्यांचा यंत्रमानव हा टिकून राहिला. 

 ह्या सगळ्या आघातातून मानव जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्याला कंट्रोल करणारे कोणीही नव्हती त्याला ज्ञान देणारे कोणीही नव्हती तो एखाद्या लहान मुलासारखा होता त्याचा मेंदू कोरा होता म्हणून आज आपण असे म्हणू शकतो की आफ्रिकेच्या जंगलामधून माणसांनी जगायला सुरुवात केली म्हणजे त्याने खूप प्राथमिक अवस्थेपासून जगायला सुरुवात केली त्यानंतर अश्मयुग आले ताम्रयुग आले त्यानंतर अशीच युगे गेली आणि त्यानंतर आजचे हे आधुनिक युग चालू आहे.आजच्या युगामध्ये मानवाने वैज्ञानिक क्रांती करून खूप मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले आहे. हा आपला इतिहास आजपर्यंतचा आहे आणि तो सगळ्यांना पाठ आहे म्हणजे माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्ष झालेली आहे तो इतिहास सर्वांनाच माहीत आहे आता आपण काही आत्ताच्या विज्ञानाला जी अनुत्तरीत प्रश्न आहेत त्यांच्याकडे पाहू या प्रश्नां मध्येच आपले उत्तर लपलेले आहेत प्रश्न क्रमांक एक: सात हजार वर्षापूर्वी इजिप्त मधले पिरॅमिड इतके तंतोतंत कोणी बांधले? 

 दोन: पाच हजार वर्षापूर्वी मोहेंजोदडो ही संस्कृती इतकी उन्नत कशी होती?

 तीन : रामायणा मध्ये पुष्पक विमानाचे आणि आत्ताच्या विमानाचे इतके तंतोतंत वर्णन कसे काय आहे? 

 असे एक ना अनेक प्रश्न आजच्या विज्ञानाला थक्क करत आहे आपल्याकडे जी आज टेक्नॉलॉजी आहे ती वापरूनही आपण वरील तीन सांगितलेल्या गोष्टी आत्ताच्या काळामध्ये सहज साध्य करू शकत नाही पण पाच हजार वर्षांपूर्वी माणसाने त्या कशा काय साध्य केल्या असतील याला काही लोक असे उत्तर देतात की त्या त्याकाळी परग्रहवासी पृथ्वीवर आले होते आणि त्यांनी आपल्याला हे सगळे उभारून दिले...... आता आपण पिरॅमिड बद्दल पुढे बोलूया त्याकाळी पिरॅमिड कसाकाय बांधला असेल कारण की एक पिरॅमिड बांधण्यासाठी 23 टनाचा एकेक दगड आहे असे वीस लाख दगड एकावर एक रचून तो पिरॅमिड बनवलेला आहे आणि त्या पिरॅमिडचे दगड असे एकावरती एक इतके तंतोतंत ठेवलेले आहेत की त्यामध्ये आधुनिक युगातले ब्लेड ही जाऊ शकत नाही हे कसं काय शक्य आहे पाच हजार वर्षांपूर्वी अशी कोणती टेक्नॉलॉजी होती की त्यांनी इतके अतिप्रचंड भव्य पिरॅमिड बांधले. शास्त्रज्ञांनी या वरती खूप वर्ष संशोधन केले पण कोणालाही समाधानकारक उत्तर देता आले नाही जेव्हा कोणालाही समाधानकारक उत्तर देता येत नाही तेव्हा त्याचा संबंध थेट देवांशी जोडला जातो म्हणजे हे देवाने बनवले असेल असे काही लोक मानतात पण शास्त्रज्ञ देव ही संकल्पना मान्य करायला तयार नाहीत मग त्यांनी नवी त्यांची थेअरी जन्माला घातली ती म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वी या पृथ्वीवर परग्रहवासी म्हणजे एलियन्स आले आणि त्यांनी मानवाला ज्ञान दिले आणि मानवाने आणि एलियन म्हणजे परग्रहवासी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी पिरॅमिड्स बांधले ही थेअरी आज शास्त्रज्ञ जगन्मान्य करण्याच्या मार्गावर आहेत. 

 पण ही थेअरी इतकी स्ट्रॉंग नाहीये कारण की जर परग्रहवासी म्हणजे एलियन्स आपल्या पृथ्वीवरती आले असेल तर त्यांना पृथ्वीवर येऊन एवढे भव्य पिरॅमिड बांधायची गरज का लागली आणि मुळात हा प्रश्न अनुत्तरित राहतो की त्यांनी दुसऱ्या ग्रहावरून येऊन आपल्या पृथ्वी या ग्रहावर ते लोकांना शिक्षित म्हणजे ज्ञान का दिले त्यांचा यामागील हेतू काय होता आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ते एलियन्स म्हणजे परग्रहवासी गेले कुठे ते परत का आले नाहीत कारण की गेल्या पाच हजार वर्षाच्या इतिहासामध्ये अशी कुठेही नोंद सापडत नाही की मानवाने परग्रहवासी पाहिलेले आहेत. 

 या प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ञांना सापडलेली नाही. मी या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो पण फक्त ती वाचकांनी थोड्या  विवेकबुद्धीने वाचली पाहिजे आणि त्यावर शांत चित्ताने विचार केला पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे.

 आता आपण वर्तमान काळामध्ये येऊ आपण एकविसाव्या शतकामध्ये जगत आहोत आपण चंद्र पादक्रांत केला आहेत आपल्याकडे अण्वस्त्र आहेत आपण मंगळ मोहिमा करत आहोत अजून दहा हजार वर्षांनी आपण एवढे उन्नत झालेलो असो की आपण त्या वेळी ^टाईम मशीन^ बनवलेली असेल म्हणजेच आपण त्या मशीन मध्ये बसून भविष्यामध्ये किंवा भूत काळामध्ये कोठेही जाऊ शकत असू ही कल्पना नाहीये हे सत्य आहे.

 दहा हजार वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे आपण या वर्षामध्ये विज्ञानामध्ये एवढी महाप्रचंड प्रगती करू की आज त्याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही माझा असा दावा आहे की दहा हजार वर्षानंतर माणसाने नक्कीच टाईम मशीन बनवलेली असेल आता आपण टाईम मशीन म्हणजे काय ही संज्ञा स्पष्ट करू टाईम मशीन ही अशी सज्ञा आहे की या मशीनमध्ये बसून आपण भविष्य काळामध्ये 5000 10000 15000 किंवा वीस हजार वर्ष पुढे जाऊन त्या काळामध्ये काय होत आहेत ते पाहू शकतो त्याच बरोबर आपल्याला या मशीनमध्ये बसून भूत काळामध्ये ही जाता येते दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार वर्षांपूर्वीही आपल्याला मागे जाता येतील आता तुम्ही म्हणाल की कसं काय शक्य आहे हे शक्य आहे टाईम मशीन बनवणे आज तुम्हाला असंभवनीय वाटत असेल तरी भविष्य काळामध्ये ते शक्य होणार आहे.

 टाईम मशीन: टाईम मशीन मध्ये बसून आपण भविष्यामध्ये आणि भूतकाळ यामध्ये अशा दोन्ही प्रकारांमध्ये जाऊ शकतो. पण यामध्ये एक कमतरता आहे आपण भविष्यामध्ये जाऊ शकतो पण भविष्यामध्ये आपण ढवळाढवळ करू शकत नाही नाहीतर विरोधाभास तयार होतील त्याचप्रमाणे आपण भूत काळामध्ये ही जाऊ शकतो पण आपण त्या भूतकाळात मध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. आज आपल्याला माहित आहे की प्रकाशाचा वेग प्रतिसेकंद तीन लाख किलोमीटर आहे म्हणजे सूर्यापासून पृथ्वी वर येण्यासाठी प्रकाशकिरणला आठ मिनिटांचा वेळ लागतो. आणि आपल्याकडे जी आज टेक्नॉलॉजी आहे ती खूप मागे आहेत आपण प्रकाशाच्या वेगाच्या जवळपासही अजुन पोहोचलो नाही पण आपण दहा हजार वर्षांनी बरोबर प्रकाशाचा वेग धारण केलेला असू म्हणजे आपण त्या काळी प्रतिसेकंद तीन लाख किलोमीटर या वेगाने प्रवास करायला सक्षम असू आणि जेव्हा आपण प्रतिसेकंद तीन लाख किलोमीटर या वेगाने प्रवास करू तेव्हा आपल्याला ही कॅपाबिलिटी मिळेल की आपण एक तर भविष्यात जाऊ शकतो किंवा भूत काळामध्ये जाऊ शकतो.

 मी आता परिस्थितीचे सविस्तर वर्णन करणार आहे दहा हजार वर्षांनी मानव खूप उन्नत झालेला असेल त्याच्याकडे टाईम मशीन ही असेल. त्यावेळेस चा माणूस हा भविष्यामध्ये जाऊन काहीतरी विलक्षण करण्याचा प्रयत्न करणार नाही पण तो भूतकाळ मध्ये जाऊन काहीतरी विलक्षण करण्याचा प्रयत्न करेल. तो टाईम मशीन मध्ये बसून पाठीमागे भूत काळामध्ये जाईल आणि जेव्हा तो भूत काळामध्ये उतरेल तेव्हा त्याला असे दिसेल की इजिप्त या देशांमध्ये सगळे मानव खूप प्राथमिक अवस्थेमध्ये मानव रहात होते. तो भूत काळामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळा-ढवळ करू शकत नव्हता पण त्यांनी जर अशीच परिस्थिती ठेवली असती तर त्या मानवाला विकसित व्हायला अजून कमीत कमी चार लाख वर्ष लागली असती. मग त्या उन्नत मानवांनी विचार करायला सुरुवात केली की आता काय करावे मग त्यांना एक मार्ग सापडला की आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे ती आपण या अप्रगत आपल्या पूर्वजांना दिली तर ती प्रगती दहा पटीने करू शकतील आणि आपण हस्तक्षेप न करता ही आपले भविष्य बदलता येईल. उदाहरणार्थ त्याकाळी मानवाला चाकाचा शोध लागला नव्हता आणि तो लागण्यासाठी कमीत कमी हजार वर्षाचा काळ लागला असता पण या उन्नत मानवांनी त्यांना एका दिवसामध्ये चाक या संज्ञेचे महत्त्व पटवून दिले म्हणजे एक हजार वर्षांमध्ये जी प्रगती होणार होती ती या भविष्य मधून आलेल्या माणसाने एका दिवसांमध्ये करून दिली म्हणजे किती क्रांतिकारक हा प्रयोग होता आणि भविष्यामध्ये ही कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ झालेली नव्हती. या प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी आपल्या अप्रगत पूर्वजांना शिक्षित करायला सुरुवात केली कमीत कमी एक हजार वर्ष या पृथ्वीवरती राहून आपल्या प्रगत पूर्वजांना ज्ञानदानाचे कार्य करत होते आणि तेव्हाचे मानव त्या लोकांना देव समजत होते कारण की ते अतिप्रगत याने (विमान) वापरत होते वापरत होते. अतिप्रगत मानव हे अंतरिक्ष यांना मधून आकाशातून जमिनीवर येत असत त्यांच्या विमानांना मोठे मोठे प्रकाशित दिवे असत आणि त्यांनी वेगळ्या प्रकारची आधुनिक वस्त्रे परिधान केलेली असत त्यामुळे त्या अप्रगत माणसांना की सगळे देव वाटत असत. त्या प्रगत माणसांनी अप्रगत माणसांना ज्ञान देण्याबरोबरच समाज व्यवस्था कशी असावी या संदर्भातही मार्गदर्शन केले आणि काही मार्गदर्शक तत्वे त्यांनी काही लोकांना लिहून दिली हीच मार्गदर्शक तत्त्वे पुढे धर्मग्रंथ या नावाने उदयास आली. उदाहरणार्थ कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता ही माणसाने समाजामध्ये कसे वागले पाहिजे याची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. बायबल ही मार्गदर्शक तत्वे आहेत किंवा कुराण हे ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. नंतरच्या काळामध्ये यावरूनच गीता सांगितली म्हणजे ती हिंदू लोकांची झाली कुराण म्हणजे मुस्लिम लोकांचे झाले आणि बायबल हे ख्रिस्ती लोकांची झाली या प्रकारे या पृथ्वीवरती धर्माची स्थापना झाली. धर्मामुळे मानवी मनात एक प्रकारचे भय उत्पन्न झाले आणि समाज घडणीमध्ये याचा खूप मोठा फायदा झाला समाजामध्ये जी अशांतता अनैतिकता होती धर्माच्या प्रभावामुळे ती नष्ट झाली आणि याचे सगळे श्रेय त्या प्रगत माणसांना जाते. म्हणजे धर्म ही देवाने तयार केलेला नसून माणसानेच तयार केलेला आहे.

 प्रगत माणसांनी अप्रगत माणसांना एक हजार वर्षापर्यंत शिक्षित केले आणि त्यांना जेव्हा वाटले की हा माणूस आता खूप झपाट्याने प्रगती करू शकतो तेव्हा ते परत आपल्या वर्तमान काळामध्ये गेले. या गोष्टीची प्रणिती म्हणजे माणूस गेल्या दोन लाख वर्षापासून या पृथ्वीवरती आहे पण फक्त पाच हजार वर्षांमध्ये एवढी नेत्रदीपक प्रगती केलेली आहे की त्या 2,00,000 वर्षाला आपण भारी पडलो आहोत.

 पुढील पाच हजार वर्षांमध्ये आपण खूप नेत्रदीपक प्रगती केली आहेत ती सगळी प्रगत माणसांच्या जीवावर अशीच आहेत म्हणजे माणसानेच माणसाला तयार केलेले आहे.

 आजचा माणूस जसा दिसतो तसा पाच हजार वर्षापूर्वी माणूस दिसत नव्हता तो खूप ओबडधोबड होता पण जेव्हा प्रगत माणसांनी त्यांना पाहिले तेव्हा त्यांनी त्याकाळच्या काही स्त्रियांशी लग्न केली आणि संताने उत्पन्न केली म्हणजेच त्या प्रगत माणसाने त्याकाळच्या माणसांमध्ये जेनेटिक्स क्रांती केली आणि विज्ञानाने काही जनुकीय रचनेत बदल केला जसे की मेंदूच्या बाबतीत त्याकाळी माणसाचा मेंदू एवढा तलक नव्हता पण प्रगत माणसाने त्याच्या शरीरामध्ये काही जनुकीय रचना केल्या आणि याचा फरक असा झाला की त्या अप्रगत माणसांचा मेंदू पुढील हजार वर्षांमध्ये तलक व्हायला लागला आणि जनुकीय फेर रचनेमुळे त्यांची शारीरिक ताकद आणि बौद्धिक क्षमतामध्ये ही फरक पडत गेला म्हणजे खऱ्या अर्थाने माणसाने माणसालाच तयार केले. 

Comments

  • Nov 24, 2019

Log Out?

Are you sure you want to log out?