
पहिल्या नजरेत..
Read Count : 136
Category : Books-Fiction
Sub Category : Romance
कॉलेज चा पहिला दिवस हा प्रत्येकाच्याच जीवनातला एक संस्मरणीय दिवस असतो, अगदी जशी एखादी नवी नवेली नवरी सासरी जावी तसाच काहीसा अनुभव असतो हा,त्यात वरून नणंद भावजय सारखे ईर्षेने, कुतुहलाने किंवा 'कोण्या गावाचं आलं पाखरू' या भावनेतून चेहरे न्याहळणारे सिनियर्स त्यात अजून भर घालत असतात.थोडी शी भीती,थोडा नर्व्हसनेस आणि बरीचशी उत्सुकता घेऊन नवीन ऍडमिशन मिळालेले नवीन चेहरे कॉलेजच्या वातावरणाला नवीन पालवी फुटलेल्या वसंतऋतूचं रूप आणतात;आणि मग अशा या वसंतात तरुणाईला प्रेमाच्या उकळ्या फुटल्या नाही तरच नवल! नवीन नवीन चेहरे पाहून पुन्हा ही माझी ती तुझी या अशा वाटण्या सिंगल राहिलेल्या सिनियर मुलांमध्ये आपसूक च सुरू होतात,समोरून काही भाव भेटो न भेटो पण ही अप्रत्यक्ष स्पर्धा कॉलेजच्या प्रांगणात हळू हळू जोर धरू लागते हे नक्की!
पण इथं कहानी काहीशी वेगळी आहे,तो फक्त सिनियर च नाही तर पीजी स्टुडंट सुद्धा आहे त्यामुळे सुद्धा आहे, साहजिकच एक सभ्य इमेज मेंटेन करण्या च्या