ती ,मी आणि कॅडबरी!
Read Count : 71
Category : Books-Fiction
Sub Category : Romance
जीवनातला गुलाबी काळ म्हटलं तर आपलं कॉलेज जीवन,या काळातील वेगवेगळे किस्से,आठवणी आणि प्रकरणं आपल्या जीवनाला अधिक मेमरेबल करत असतात! प्रकरणं या शब्दाचा अर्थ प्रेम प्रकरण असाच घ्यावा असा माझा आग्रह नसला तरी एखादं का होईना प्रेम प्रकरण असावं या मताशी मी सहमत आहे...!कारण जसं एखादा चित्रपट कुठल्याही विषयावर असला तरी त्यात नायका सोबत एखादी का होईना नायिका असणं हे कथानकाची गरज च बनलेली असते अगदी तसंच कॉलेज च्या काळात एखादी मित्र,मैत्रीण,अगदी पुढे च जाऊन बोलायचं झालं तर बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असावीच हा एक प्रघात आजकाल रूढ होत चालला आहे आणि त्यात वावगं तरी काय; कारण ज्या वयात आपण आपलं महाविद्यालयीन शिक्षण घेत असतो तो काळ अगदी पौगंडावस्थेतील जवळ जवळ प्रौढ होण्याच्या थोडा आधीचा आणि साहजिक च या काळात आपल्याला आई वडिलांपेक्षा, भावा बहिणीपेक्षा,मित्र मैत्रिणी पेक्षा वेगळं पण तेवढं च जवळचं कोणी तरी असावी याची गरज सातत्याने भासत असते हा एक नैसर्गिक बदल आहे, आणि हा बदल आणि गरज पूर्ण करण्यासाठी आपल मन कळत नकळत आशा व्यक्तीला शोधत असतं, यात कोणाची फसगत ही होते, तर कोणाचं लग्न च होऊन जातं,पण यात ही काही कहाण्या अशा असतात ज्यात लग्न ही होत नाही आणि फसगत ही नाही....माझ्या मते अशीच कहाणीच कदाचित प्रेम कहाणी म्हणून अमर होत असावी,किमान त्या दोघांच्या आयुष्या पुरती तरी!प्रेम पूर्णत्वास जाणं हे जरी परिस्थिती च्या हातात असलं तरी प्रेम करणं हे आपल्या हातात असतं आणि ते सतत करत रहावं...अगदी जशी एखादं कॅडबरी चं चॉकलेट शेवटच्या बाईट पर्यंत आपली गोडी सोडत नाही अगदी तसं! बाकी या शिर्षका मागे कॅडबरी नाव वापरण्यात काय काय दडलंय ते पुढे पुढे आपल्या लक्षात येईल च!