
विश्वास
Read Count : 151
Category : Poems
Sub Category : N/A
नभात जळतोय सूर्य तळपतोय
खग तृष्णेने व्याकुळला
पाणी शोधीत पक्ष फडफडीत
रानोरानी फिरला।
पण व्यर्थ गेेेेले कष्ट तयाचे
पाणी न मिळाले
थकून भागून उपवनी ते
विसाव्याला आले।
आशा तयाची जगण्याची
अजून जिवंत होती
नियती संंगे खेेळ तयाचा
गाठ प्राणाशी होती।
चुुुुकलेले ते एकले खग
धिराने घेत होते श्वास
मित्र तयाला एक सोबती
नाव तयाचे विश्वास
क्षणात आभाळ काळं झालं
मेघ बहरुन आले
अमृत वृष्टटी जाहली धरेवर
तयाचे प्राण हृदयी आले।
मनोहर मृत्तिका गंध घेऊन
वसुंधरेवर वर्षा अवतरली
तृृृप्त जाहले खग अंतरी
अवनीवरी प्रेेमऋतू बहरली।
******