जय मल्हार Read Count : 150

Category : Poems

Sub Category : N/A
परिसा सज्जनो
 कथा मल्हारी मार्तंडभैरवाची
धन्य जया सखी पार्वतीची
धन्य ती प्रीती म्हाळसा-बाणाईची
देवांच्या देवा त्रिलोकीनाथा
अवतारला श्रीहरी तुजसाठी १
कृतयुगी मनिचुल पर्वती 
  त्राही त्राही होती माजलेली 
विटंबल्या मुनी पत्नी
गाई वासरे वधली
 आक्रमीला परिसर मणी मल्लासुरे २
 नंदनवनी वाताहात जाहली अगाध
बेमालुम गेले जीव असेच कित्येक 
गेला निघोनी चांडाळ
 दैत्य मणी-मल्लासुर ३
धावले मुनी सारे करुनी
 अभिमंत्रीत परिवारे
हाती दुर्वासें शिष्ये लवा देवोनीया 
परि असमर्थे देवेंद्र वदला 
'अजेयत्व' ब्रम्ह वरा पायी ४
ब्रम्हा आणी विष्णु बनले निष्प्रभ
सारे करीती धावा कैलासाचा
उरला तो आता जटाधारी महेश
मुनीमुखी वार्ता ऐकोनी  
मणी मल्लांचे दुर्वर्तन 
आपटल्या जटा 
क्रोधला त्रैलोक्य भगवान
अवतरली घृतमारी त्यासमयी ५
सुर्यापरी दाहक मार्तंडरुप तेजस्वी
थरथरती काया भितीपायी 
गळ्यात सर्पभुषणे,कानात कुंडले 
धरुनी त्रिशूल,डमरु 
खड्ग हाती आणि पुर्णापात्र ६
कार्तिक स्वामी नेतृत्वे 
सप्तकोटी गणासोबती 
 मार्तंडभैरव अवतरले धवलगिरी  
प्रस्थपिठी सेना उभी ठाकली युद्धासी 
उपहास केला शिवाचा 
परि घाबरला मनोमनी मल्लासुर 
भिडले यौद्धे रणी-धुरंधरी ७
घनघोर युद्ध पेटले अघोरी 
कार्तिकेयांनी धाडले 
यमसदनी खडगदृष्टां  
श्रीगणेशाने वध केला उल्कामुखाचा
कुंतमलोमाचा काळ बनला महानंदी ८
रण पेटले आग ओकली 
कोपला दैत्य मल्लासुर 
 उभा रणांगनी शुर योद्धा मणीसुर 
 खड्ग त्रिशूळानी घायाळ होऊन 
पडला जमिनीवर 
ठेवता पाय मस्तकी 
फिरली मती मागीतले इष्ट वरदान ९
नाव तुझ्या नावाआधी 
शीर असावे तुझ्या चरणतळी 
 धाडले पाताळी मनी मल्लासुरे 
स्थापली राजधानी जयाद्रीनगरी १०
 जयाद्री नगरी सोनेरी पिवळी
सजला नटला कैलास क-हेतीरी
 मल्हारी मार्तंड खड्गधारी
तोच देवांचा देव महादेव 
ठाण मांडुनी बसला चक्रधर 
शेषधारी तोच हेगडे प्रधान ११
तुझ्या ठायी आलो आता, 
ना मागणे दुसरे काही
जेजुरी माझे पंढरपुर,
मल्हारम्हाळसा माझी
विठोबा रखुमाई १२
©महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील 
©sanjweli
९४०५३८२१४३

Comments

  • i dont understand

    Feb 13, 2018

Log Out?

Are you sure you want to log out?